राज्यात पुढील दोन दिवस पाऊस , ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी

0 1,552

नवी मुंबई –   राज्यात ऑगस्ट (August) महिन्यापर्यंत शांत  राहणाऱ्या पाऊसाने सप्टेंबर (September) पासून संपूर्ण राज्याला झोडपून काढले आहे.या महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच राज्यातून मान्सून (Monsoon) ने परतीचा प्रवास सुरू केला आहे. त्यामुळेच विदर्भ, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात शनिवारी आणि रविवारी काही भागात पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.(Rain in next two days in the state, alert issued to ‘these’ districts)

बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव तयार झाल्याने राज्यात पाऊसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. त्यामुळं परतीच्या पावसानंतर राज्यात पुन्हा एकदा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे.उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नंदूरबार, धुळे, जळगाव आणि मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर या सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळं या सर्व भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवली आहे.

 

Related Posts
1 of 1,481

दरम्यान, रविवारी मराठवाड्यातील उस्मानाबाद आणि लातूर वगळता सर्वच जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. तसेच विदर्भातील गोंदिया आणि भंडारा वगळता सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन हवामान विभागाकडून केलं आहे.(Rain in next two days in the state, alert issued to ‘these’ districts)

राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीवर गंभीर आरोप लावत , शर्लिन चोप्राने दाखल केला FIR

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: