Rain in Maharashtra ,राज्यात येणाऱ्या आठवड्यात मुसळधार पाऊस

0 276

नवी मुंबई – मागच्या महिन्यात राज्यात बहुतेक राज्यात मान्सूनने विश्रांती घेतली होती. या विश्रांतीमुळे शेतकरी अडचणीत सापडला होता. मात्र आता येणाऱ्या आठवड्यात राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. (Rain in Maharashtra, heavy rain in the state in next week )

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात चांगल्या पावसाचे संकेतही देण्यात आले असून कोकण आणि विदर्भात मात्र सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तविला आहे. यंदाच्या मान्सूनचे हंगामाचे वैशिष्टय म्हणजे कमी कालावधीत होणारा जोरदार पाऊस, सातत्याने पडणारा खंड आणि असमान वातावरण.

ऑगस्टमध्ये तर पाऊस झाला नाही. मात्र आता हंगामाच्या शेवटच्या कालावधीत चांगल्या पावसाची अपेक्षा आहे. गेल्या आठवड्यात उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. तर पूर्व विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात मात्र सरासरीच्या तुलनेत अपुरा पाऊस पडला. पुढील दोन आठवड्यात पडणाऱ्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यानुसार २७ ऑगस्ट ते २ सप्टेंबर दरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. तर कोकण, उत्तर महाराष्ट्राचा काही भाग, पूर्व विदर्भात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे.

ड्रग्स प्रकरणात एनसीबीने केली मोठी कारवाई, या अभिनेतेला अटक

Related Posts
1 of 1,622

तर दुसऱ्या आठवड्यात ३ ते ९ सप्टेंबर या दरम्यान उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात सर्वदूर चांगल्या पावसाचे संकेत असून, सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे. तर मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्याच्या दक्षिण भागात मात्र पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुण्यात पावसाच्या हलक्या सरींची शक्यता पुणेकरांना शुक्रवारी श्रावणसरी अनुभवायला मिळाला. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील तीन दिवस आकाश ढगाळ राहणार असले तरीही पावसाच्या हलक्या सरी पडतील. या तीन दिवसांमध्ये आकाश सामान्यतः ढगाळ राहून पावसाच्या हलक्या सरींची शक्यता 51 ते 75 टक्के असल्याचे हवामान विभागाने सांगितले. (Rain in Maharashtra, heavy rain in the state in next week )

हे पण पहा –Rohit Pawar I ढोल वाजवण्याचा आणि नृत्याचा मोह आमदार रोहित पवारांना आवरला नाही

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: