Raids on illegal country liquor and village distilleries; Action by Sandeep MitkeRaids on illegal country liquor and village distilleries; Action by Sandeep Mitke

अहमदनगर – जिल्ह्यातील श्रीरामपुर तालुक्यात पुन्हा एकदा Dysp संदीप मिटके (Dysp Sandeep Mitke) यांच्या पथकाने मोठी कारवाई करत अवैध देशी दारू आणि गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा टाकत 86 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत तीन आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पुष्‍पाबाई प्रभाकर काळे,अशोक बाबुराव गायकवाड आणि विलास शिवाजी वाघ असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे.

२७ मार्च रोजी Dysp संदीप मिटके यांना गुप्त बातमीदार मार्फत बातमी मिळाली कि श्रीरामपुर शहरातील कदम वस्ती वॉर्ड नंबर 1 आणि  श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे गावठी हातभट्टी दारू अड्डे व  हातभट्टी दारू तयार करत आहेत. या बातमीवरून त्यांनी आपले पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सदर ठिकाणी  जाऊन छापा टाकण्याचे आदेश दिल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी  कदम वस्ती वॉर्ड नंबर 1  व श्रीरामपूर  तालुक्यातील हरेगाव  परिसरातील सर्व गावठी हातभट्टी दारू  अड्ड्यावर छापा टाकून  गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन, तयार गावठी हातभट्टी दारू यांचा नाश केला.

या कारवाईत पुष्‍पाबाई प्रभाकर काळे ,अशोक बाबुराव गायकवाड आणि विलास शिवाजी वाघ यांच्याकडून प्रोहिबिशन गुन्ह्याचा माल ताब्यातून घेत सर्व आरोपींविरुद्ध श्रीरामपूर शहर पो. स्टे.  येथे मुंबई दारूबंदी कायदा कलम 65 ( फ) (क) (ड )  (ई)  प्रमाणे  गुन्हे दाखल करण्यात आले आहे. अचानक केलेल्या या कारवाईमुळे  श्रीरामपूर शहरातील अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले असून सदर कारवाई चे श्रीरामपुर शहरातील कदम वस्ती वॉर्ड नंबर 1 व श्रीरामपूर  तालुक्यातील हरेगाव येथील महिलां कडून Dy.s.p. संदीप मिटके व त्यांचे पथकाचे कौतुक होत आहे.

सदरची कारवाई  मनोज पाटील  पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक मा.  स्वाती भोर,  यांचे मार्गदर्शनाखाली  Dysp संदीप मिटके , ASI राजेंद्र आरोळे,HC सुरेश औटी, PC नितीन शिरसाठ, आदींनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *