जुगार अड्यावर छापा , स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, इतका मुद्देमाल जप्त

0 265

अहमदनगर –  अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखे (Ahmednagar Local Crime Branch) ने कारवाई करत पाथर्डी  तालुक्यातील खरवंडी कासार येथे असणाऱ्या एका जुगार (Gambling ) अड्यावर छापा मारून तब्बल एक लाख अठ्यान्नव हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईत एकूण नऊ आरोपीना अटक करण्यात आली आहे. संजय बापु शेकडे,हनुमंत अशोक गोल्हार, बाबासाहेब जनार्दन कराड, देविदास वामन कराड,अंबादास पंडीत बटुळे,अंबादास वामन कराड, मारुती हरीभाऊ बटुळे आणि राजेंद्र महादेव दराडे असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे. (Raids on gambling dens, action by local crime branch, confiscation of so many items)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बी. जी. शेखर पाटील, (पोलीस उपमहानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र) मनोज पाटील पोलीस अधिक्षक अहमदनगर यांचे आदेशानुसार तसेच पोलीस निरीक्षक अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथकातील पोलीस अधिकारी आणि अंमलदार हे दिनांक १२ ऑक्टोबर रोजी पाथर्डी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये फरार आरोपींचा शोध घेत असतांना पोनि/अनिल कटके  यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, खरवंडी कासार गावात, बाजार तळा जवळ, पत्र्याचे शेडचे आडोश्याला काही लोक पत्त्याचा जुगार खेळत आहेत.

 हे  पण पहा –  शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्या… | आ. मोनिका राजळे आक्रमक

Related Posts
1 of 1,463

वरील माहिती मिळाल्यानंतर सदर ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेतील पोसई/सोपान गोरे, सफी/मनोहर शेजवळ, पोकॉ/राहुल सोळुंके, शिवाजी ढाकणे, जांलिदर माने, आकाश काळे अशांनी घटना ठिकाणी जावुन, मिळालेल्या माहितीची खात्री करुन, छापा टाकला असता सदर ठिकाणी  वरील आरोपी जुगार खेळताना आढळून आले. त्याच्यावर कारवाई करत रोख रक्कम, मोबाईल, मोटार सायकल व जुगाराची साधने असा एकुण एक लाख अठ्यान्नव हजार रु. किंमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने तो जप्त करून आरोपींविरुद्ध पाथर्डी पोलीस स्टेशन गु.र.नं. ७६९/२०२९ म.जु.का.क. १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कायदेशिर कारवाई पाथर्डी पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई मनोज पाटील पोलीस अधीक्षक, अहमदनगर, सौरभकुमार अग्रवाल अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर व  सुदर्शन मुंडे उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगांव विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस अधिकारी व अमंलदार यांनी केलेली आहे.(Raids on gambling dens, action by local crime branch, confiscation of so many items)

” तो ” हत्याकांड संतप्त प्रियकराकडूनच… , आरोपीला अटक

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: