DNA मराठी

Ahmednagar Crime :- नगरमधील चार हुक्का पार्लवर छापे

सावेडी उपनगरातील सुरभी हॉस्पिटलच्या पाठीमागील बाजूस सुरू असलेल्या पार्लरवरही पोलिसांनी छापा

0 227

नगर : नगर शहरासह उपनगरातील कैफे व हुक्का पार्लवरील ( On the hookah parl ) पोलिसांचे धाडसत्र सुरूच आहे. बालिकाश्रम रस्त्यावरील महाविद्यालयासमोरील हुक्का पार्लरसह शहरातील इतर चार हुक्का पार्लवर छापे टाकत तोफखाना पोलिसांनी साहित्य जप्त केले.
पोलिस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध व्यवसायांविरोधात पोलिसांनी जोरदार मोहीम उघडली आहे. पोलिस उपनिरीक्षक समाधान सोळुंके यांच्या पथकाने शनिवारी विविध ठिकाणच्या चार हुक्का पार्लवर छापे टाकले.

प्रत्येकासाठी लग्न करणे आवश्यक आहे का? त्या महिलेने श्री श्री रवी शंकर यांना विचारले, उत्तरे ऐकल्यानंतर विचार करण्यास भाग पाडले जाईल

बालिकाश्रम रोडवरील न्यू आर्टस् महाविद्यालयाच्या समोर झक्कास वडापावच्या वर एका पत्र्याच्या शेडमध्ये हुक्का पार्लर

( On the hookah parl) सुरू होते. त्यावर छापा टाकत पोलिसांनी आमिन इकबाल शेख (वय २१, रा. शिवाजीनगर, कल्याण रोड) याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून तंबाखू, हुक्का पिण्यासाठीचे पाइप, असा एकूण ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यानंतर दुसरा छापा पोलिसांनी सावेडीतील सोनानगर भागातील हॉटेल विरामशेजारी असलेल्या हुक्का पार्लरवर छापा टाकत ५ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. याप्रकरणी ऋषिकेश संतोष हिंगे (रा. पंचशीलनगर, मातोश्री उद्यान, नगर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर हे पथक नगर-मनमाड रोडवरील पंचशीलच्या तळमजल्यात सुरू असलेल्या हुक्का पार्लवर धडकले. पार्लरची झडती घेऊन पोलिसांनी ५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

Related Posts
1 of 2,494

व्हिडिओच्या आधारे ब्लॅकमेल करणाऱ्यावर गुन्हा Blackmail based on video

सावेडी उपनगरातील सुरभी हॉस्पिटलच्या पाठीमागील बाजूस सुरू असलेल्या पार्लरवरही पोलिसांनी छापा टाकला असून, याप्रकरणी फैयाज कुतुबुद्दीन जमादार (रा. गुलमोहर रोड, नगर) यास ताब्यात घेण्यात आले आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: