
E cigarettes:_ नगर ः अहमदनगर शहर व उपनगरात अवैधरित्या विक्री होणारी ई सिगारेट व हुक्का पार्लरवर अशा दोन ठिकाणांवर छापा टाकून पाच आरोपींविरूद कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्या ताब्यातून ४२ हजार ६१० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांनी खबऱ्याकडून माहिती मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेतील सहाय्यक निरीक्षक तुषार धाकराव, पोलिस अंमलदार मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, रवींद्र कर्डिले, विशाल गवांदे, सचिन आडबल, रणजीत जाधव आणि सारिका दरेकर यांच्या पथकाने अहमदनगर शहरामध्ये अवैध हुक्का पार्लर कारवाईसाठी प्रोफेसर चौक ते प्रेमदान चौक जाणारे रोडवर पान फंडा नावाचे दुकानात चेतन खर्डे सार्वजनिकरित्या मानवी जीवितास धोका निर्माण होईल,
पायलटने महिला मैत्रिणीला कॉकपिटमध्ये नेले, DGCA निलंबित, एअर इंडियाला 30 लाखांचा दंड.
असा तंबाखुजन्य पदार्थ स्वत:कडे बाळगुन ई सिगारेट हुक्यांची तंबाखू व फ्लेवर याची चोरुन विक्री करीत होता. तसेच सर्जेपुरा येथील इंगळे आर्केडचे तळघरामध्ये कृष्णा इंगळे हा बंदी असलेला हुक्का पार्लर चालविताना आढळून आला. पान फंडा येथे ई सिगारेट, हुक्क्यासाठी आवश्यक तंबाखुजन्य पदार्थ, विविध कंपनीचे फ्लेवर व साधने असा २२ हजार ३८० रुपये किंमतीचे मुद्देमालासह ताब्यात घेतले. तसेच सर्जेपुरा येथील इंगळे आर्केड येथील तळघरात हुक्का पिणाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले. या ठिकाणी हुक्क्याचे साहित्या २० हजार २३० रुपये किंमतीचे मुद्देमाल असा एकूण ४२ हजार ६१० रुपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यात
चेतन बाबासाहेब खर्डे (वय ३१, रा. प्रोफेसर चौक, सावेडी), प्रशांत गजानन सोनवणे (वय ३२, रा. केडगाव), जुबेर फिरोज सय्यद (वय १९, रा. बोल्हेगाव, ता.नगर), तेजस मिलिंद भिंगारदिवे (वय २०, रा. आर्यन कॉलनी, बोल्हेगाव), कृष्णा अशोक इंगळे (रा. सर्जेपुरा, स्ध्या फरार) या पाच आरोपींविरूद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.