वेश्या व्यवसायावर छापा, DySP संदीप मिटके यांच्या पथकाची कारवाई, 2 आरोपी अटक

0 517
अहमदनगर –  DY. S.P. संदीप मिटके (DY. S.P. Sandeep Mitke) आणि त्यांच्या पथकाने राहुरी तालुक्यात एकाच वेळी दोन ठिकाणी छापा मारून वेश्या व्यवसायाकरणाऱ्या (prostitution) दोन आरोपीना अटक केली आहे. या कारवाईत तीन पीडित महिलांची देखील सुटका करण्यात आली आहे. (Raid on prostitution business, action of DySP Sandeep Mitke’s squad, 2 accused arrested)
या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार DY. S.P. संदीप मिटके यांना राहुरीतील हॉटेल न्यू भारत तसेच राहुरी ते शिर्डी जाणारे रोडवर हॉटेल न्यू प्रसाद चे शेजारी सेक्स रॅकेट वेश्याव्यवसाय करून घेतल्या जात आहे बाबत खात्रीशिर बातमी मिळाली.  त्याप्रमाणे राहुरी शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी बनावट ग्राहक पाठवुन  पंचासमक्ष छापा टाकुन  तीन पिडीत  महिलांची सुटका करण्यात आली आहे.
Related Posts
1 of 1,603
या प्रकरणात LPN स्वाती कोळेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सय्यद फरहाद इरशाद अहमद (वय 34 रा बुवासिंद बाबाचा दर्गा समोर राहुरी) याच्याविरुद्ध राहुरी पोलीस स्टेशन येथे स्त्रियांचा अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर  LPC मीना नाचन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजू शिवाजी इंगळे (रा इंदिरा नगर वार्ड नंबर 6 श्रीरामपूर याच्या विरुद्ध राहुरी पोलिस स्टेशन येथे महिलांचा अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा 1956 कलम नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
एकाच वेळी दोन ठिकाणी नियोजनबद्ध पद्धतीने छापा टाकण्यात आलेला आहे या कारवाईमुळे राहुरी शहरातील अवैध धंदे करणार्‍यांचे धाबे दणाणले आहे.सदरची कारवाई मनोज पाटील  पोलीस अधीक्षक, डॉ.  दिपाली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली Dyspसंदीप मिटके , PI मधुकर साळवे, पो.कॉ. नितीन शिरसाठ, आजिनाथ पाखरे,  सचिन ताजणे,  गणेश फाटक,  इफ्तेकार सय्यद, चा.पो.का  चांद सय्यद, LPN स्वाती कोळेकर ,LPC मीना नाचन यांच्या पथकाने केली.(Raid on prostitution business, action of DySP Sandeep Mitke’s squad, 2 accused arrested)
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: