अवैध गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा, 3 आरोपी ताब्यात

0 180
अहमदनगर –   D.y.SP संदीप मिटके (Sandeep Mitke)  यांच्या पथकाने श्रीरामपुर तालुक्यातील टाकळीभान येथील अवैध गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा टाकून 1 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमालसह तीन आरोपीना अटक केली आहे. (Raid on illegal village hand kiln liquor den, 3 accused arrested)
या प्रकरणात मिळालेली अधिक माहिती अशी कि  दि.  01 सप्टेंबर रोजी Dy.s.p. संदीप मिटके यांना गुप्त बातमीदार मार्फत श्रीरामपुर तालुक्यातील टाकळीभान येथे गावठी हातभट्टी दारू अड्डे व  हातभट्टी दारू तयार करत आहेत  अशी  खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यांनी आपले पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सदर ठिकाणी  जाऊन छापा टाकण्याचे आदेश दिल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी टाकळीभान परिसरातील सर्व गावठी हातभट्टी दारू  अड्ड्यावर छापा टाकून  गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन, तयार गावठी हातभट्टी दारू  यांचा नाश करण्यात आला.
या कारवाईत संजय कारभारी गांगुर्डे (रा माळेवाडी टाकळीभान तालुका श्रीरामपूर), गणपत डुकरे (रा. टाकळीभान तालुका श्रीरामपूर) ( फरार) 42,000/-  रु. कि.चे 600 लिटर  गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन ( किं.अं.) 2500/- रू किमतीची 25 लिटर तयार गावठी हातभट्टी दारू( आंबट उग्र वासाची किं. अं.) शांताबाई गणपत जाधव रा. गावठाण टाकळीभान तालुका श्रीरामपूर
Related Posts
1 of 1,608
31,500 रु. कि.चे 450 लिटर  गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन ( किं.अं.) 2000 रू  किमतीची 20  लिटर तयार गावठी हातभट्टी दारू( आंबट उग्र वासाची (किं.  अं.), आशाबाई शिवाजी पवार रा. गावठाण टाकळीभान तालुका श्रीरामपूर 35,000/-  रु. कि.चे 500 लिटर  गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन ( किं. अं.) 2000/- रू  किमतीची 20  लिटर तयार गावठी हातभट्टी दारू ( आंबट उग्र वासाची किं. अं.) एकूण 1 लाख 15 हजार रुपये वरील वर्णनाचा व किमतीचा प्रोहिबिशन गुन्ह्याचा माल आरोपींचे ताब्यातून जप्त केला असून सर्व आरोपींविरुद्ध श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन येथे, मुंबई दारूबंदी कायदा कलम 65 ( फ) (क) (ड )  (ई)  प्रमाणे  गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
अचानक झालेल्या या कारवाईमुळे  टाकळीभान परिसरातील अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले असून सदर कारवाई चे टाकळीभान येथील महिलांनी  Dy.s.p. संदीप मिटके व त्यांचे पथकाचे कौतुक  करून आभार व्यक्त केले. सदरची कारवाई  मनोज पाटील  पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक मा. डॉ. दिपाली काळे,  यांचे मार्गदर्शनाखाली  Dy.s.p  संदीप मिटके, A.s.I.राजेंद्र आरोळे,H.c. सुरेश  औटी, पो. कॉ. नितीन शिरसाठ,  निखिल मसराम, मारुती माळी म.पो.कॉ. प्रज्ञा डोंगरे, पल्लवी तुपे व आर. सी. पी. पथक श्रीरामपूर आदींनी केली. (Raid on illegal village hand kiln liquor den, 3 accused arrested)
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: