अवैध गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा ,Dy.s.p संदीप मिटके व पथकाची कारवाई

0 177
अहमदनगर –   Dy.s.p संदीप मिटके (Dy.s.p Sandeep Mitke ) आणि त्यांच्या पथकाने वळाली प्रवरा येथील अवैध गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा टाकून  1 लाख 10 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल सह  पाच आरोपीविरोधात गुन्हे दाखल केले आहे . अहमदनगर पोलीस अधिकक्ष मनोज पाटील अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे यांचे मार्गदर्शनाखाली  Dy.s.p  संदीप मिटके, ASI.राजेंद्र आरोळे,H.c. सुरेश  औटी, P.N  पंकज गोसावी, पो. कॉ. नितीन शिरसाठ, राहुल नरवडे, सुनील दिघे गौतम लगड, Lpc. पूजा पवार, अनिता गीते आदींनी ही कारवाई केली आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार ८ सप्टेंबर रोजी  Dy.s.p. संदीप मिटके यांना गुप्त बातमीदार मार्फत देवळाली प्रवरा येथे गावठी हातभट्टी दारू अड्डे व  हातभट्टी दारू तयार करत आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यांनी आपले पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सदर ठिकाणी जाऊन छापा टाकण्याचे आदेश दिल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी देवळाली प्रवरा येथे परिसरातील सर्व गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा टाकून गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन, तयार गावठी हातभट्टी दारू यांचा नाश करण्यात आला.
Related Posts
1 of 1,608
या कारवाईत मंगल गोरक्षनाथ गायकवाड (रा. देवळाली प्रवरा), कचरू राजेंद्र गायकवाड, रमेश गायकवाड ,रवि डुकरे,अजय जाधव या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्याकडून एकूण 1 लाख 10 हजार 600 रुपये किंमतीचा प्रोहिबिशन गुन्ह्याचा माल जप्त करून  आरोपींविरुद्ध राहुरी पोलीस स्टेशन येथे, मुंबई दारूबंदी कायदा कलम 65 ( फ) (क) (ड )  (ई)  प्रमाणे  गुन्हे दाखल करण्यात आले आहे. अचानक झालेल्या या कारवाईमुळे  देवळाली प्रवरा परिसरातील अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले असून सदर कारवाई चे देवळाली प्रवरा येथील महिलांनी  Dy.s.p. संदीप मिटके व त्यांचे पथकाचे कौतुक  करून आभार व्यक्त केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उड्डाणपूलाचे छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल नामकरण 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: