मुंबई, पुणेमध्ये छापेमारी प्रकरण तब्बल 184 कोटींची बेहिशेबी मालमत्ता उघड

0 202

नवी मुंबई –  ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून आयकर विभागा (Income Tax Department) ने राज्यातील विविध शहरातील अनेक ठिकाणी छापेमारी सुरू केली आहे. या छापेमारीत तब्बल 184  कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता (Assets) समोर आली असल्याची माहिती सीबीटीने दिली आहे. राज्यातील मुख्य शहरे पुणे , मुंबई , बारामती इत्यादी शहरात ही छापेमारी करण्यात आली आहे. (Raid case in Mumbai, Pune reveals unaccounted assets worth Rs 184 crore)

सीबीडीटी (CBT) ने सांगितले की, दोन रिअल इस्टेट उद्योगांच्या कार्यालयावर आणि त्यांच्याशी संबंधित व्यक्ती, संस्थांवर छापेमारी करण्यात आली. झाडाझडती दरम्यान बेहिशेबी आणि बेनामी आर्तिक व्यवहारांचा खुलासा झाला आहे. काही संशयास्पद व्यवहार, कागदपत्रे आढळून आले आहेत. तसेच या दोन्ही ग्रुप्सच्या जवळपास 184 कोटी रुपयांच्या बेहिशेबी मालमत्तेचा खुलासा झाला आहे.

राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीवर गंभीर आरोप लावत , शर्लिन चोप्राने दाखल केला FIR

Related Posts
1 of 1,463

छापेमारी दरम्यान 2.13 कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड आणि 4.32 कोटी रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. या प्रकऱणी अद्यापही सर्च ऑपरेशन सुरू आहे. दोन्ही ग्रुप्सने केलेले व्यवहार संशयास्पद आढळून आले आहे असंही आयकर खात्याने म्हटलं आहे. बोगस शेअर प्रीमिअर, संशयास्पद असुरक्षित कर्ज, विशिष्ट सेवांसाठी आगाऊ रक्कम, लवाद सौदे यासारख्या संशयास्पद मार्गाने ही बेहिशेबी मालमत्ता जमवल्याची माहिती समोर येत आहे. संशयास्पद पद्धतीने जमवलेला हा पैसा मुंबईतील विविध ठिकाणी कार्यालय इमारत, गोव्यात रिसॉर्ट, महाराष्ट्रातील विविध भागांत शेतजमीन, साखर कारखान्यांत गुंतवणूक, दिल्लीत फ्लॅट घेण्यासाठी वापरण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या सर्वा संपत्तीची एकूण किंमत जवळपास 170 कोटी रुपयांच्या घरात आहे.(Raid case in Mumbai, Pune reveals unaccounted assets worth Rs 184 crore)

 हे  पण पहा –  शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्या… | आ. मोनिका राजळे आक्रमक

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: