कुकडी सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदी पुन्हा राहुल जगताप….

0 109
Rs 17.00 crore sanctioned for construction of 21 dams in Shrigonda taluka - Rahul Jagtap
 श्रीगोंदा  –  तालुक्यात सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम नुकताच पार पडला. त्यामध्ये कर्मयोगी कुंडलिकराव रामराव जगताप पाटील कुकडी सहकारी साखर कारखाना निवडणूक माजी आमदार राहुल जगताप यांनी बिनविरोध केली. राहुल जगताप (Rahul Jagtap) यांनी ही निवडणूक बिनविरोध केल्याने त्यांची राजकीय पकड पुन्हा एकदा तालुक्यात या निमित्ताने घट्ट झाली असून कार्यकर्त्यांनी यावेळी जोश व्यक्त केला.(Rahul Jagtap re-elected as chairman of Kukdi Sahakari Sugar Factory ….)
जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी चेअरमन व्हा. चेअरमन निवडीची प्रक्रिया पार पाडली. श्री. एम. जी. शिंदे यांनी राहूल जगताप यांच्या चेअरमन पदाच्या निवडीची सूचना मांडली. त्याला सर्वांच्या वतीने अनुमोदन मोहनराव कुदांडे यांनी दिले. तर व्हा. चेअरमन पदाची निवडीची सूचना निवृत्ती वाखारे यांनी मांडली या सूचनेला श्री. संभाजीराजे देवीकर यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची अधिकृत घोषणा करताच कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतषबाजी करीत आनंद व्यक्त केला.
यावेळी  डॉ. प्रणोती राहुल जगताप, निवृत्ती वाखारे, विजय शिर्के, सुभाष राक्षे,संभाजी देवीकर, अशोक वाखारे, मोहन आढाव,मनोहर शिंदे, कचरूजी मोरे, प्रमोद इथापे, मच्छीन्द्र नलगे, जालिंदर निंभोरे , अशोक शितोळे, बाळासाहेब उगले, आबासाहेब शिंदे, अनिता लगड, विमल मांडगे, मोहन कुदांडे , संपत कोळपे  या नवनिर्वाचित संचालकांचा फेटा व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस घनश्याम अण्णा शेलार, नगराध्यक्ष मनोहर पोटे माजी सभापती संभाजी देवीकर, यांच्या हस्ते  नूतन चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचा सत्कार केला. यावेळी तालुक्यातील पदाधिकारी सभासद यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
आदरणीय तात्या नंतर कारखान्या ची ही पहिलीच निवडणूक होती. परंतु घनश्याम अण्णा शेलार, बबनराव पाचपुते, राजेंद्र नागवडे, अण्णासाहेब शेलार, बाबासाहेब भोस दीनुकाका पदंरकर, सर्वच प्रमुख नेत्यांनी कारखाना बिनविरोध करण्यासाठी सहकार्य केले त्यामुळे हा कारखाना बिनविरोध झाला. तात्या आज आपल्यात नाहीत याची जाणीव देखील होऊ दिली नाही. तात्याप्रमाणे माझ्या मागे खंबीरपणे सर्वजण उभे राहिले असे भावनिक उदगार राहुल जगताप यांनी काढले. भविष्यात कारखाना जिल्ह्यात एक नंबर करून सभासद शेतकरी कामगार यांना न्याय देण्यासाठी  लक्ष देणार असल्याचे माजी आमदार राहुल जगताप यांनी सांगितले. उद्याच्या काळात कारखाना  जिल्ह्यात एक नंबरचा उसाला बाजार देऊन सभासदांना न्याय देण्याचे कार्य करेल अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी चे प्रदेश सरचिटणीस घनश्याम शेलार यांनी दिली.
Related Posts
1 of 2,088
 कुकडी परिवाराने व्हाईस चेअरमन पदाची जी संधी दिली त्या संधीचे सोने करून संचालक व सभासद यांना विश्वासात घेऊन काम करू अशी प्रतिक्रिया नूतन व्हाईस चेअरमन विवेक पवार पाटील यांनी व्यक्त केली.(Rahul Jagtap re-elected as chairman of Kukdi Sahakari Sugar Factory ….)
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: