अजनुज सोसायटीवर राहुल जगताप गटाचे निर्विवाद वर्चस्व

0 770
Rahul Jagtap group's undisputed dominance over Ajanuj society

 

 श्रीगोंदा-  श्रीगोंदा तालुक्यातील बहुचर्चित अजनुज विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या. अजनुज या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली या निवडणूकीत  श्री वळणेश्वर विकास पॅनलचा दणदणीत विजय झाला असून या सेवा संस्थेवर मा.आ. राहुल जगताप गटाने तेरा पैकी अकरा जागा मिळवत निर्विवाद वर्चस्व मिळवले. बाळासाहेब हौसराव गिरमकर यांच्या नेतृत्वाखाली या संस्थेच्या निवडणुकीत श्री वळणेश्वर विकास पॅनल तयार करण्यात आला होता. या निवडणुकीत तीन पॅनल तयार झाले होते.

 

घोड पट्ट्यातील ही महत्त्वाची संस्था असल्याने तालुक्यातील नेत्यांनी या निवडणुकीकडे लक्ष केंद्रित केले होते. या निवडणुकीत तेरा पैकी अकरा जागा मिळवत मा.आ. राहुल जगताप गटाने सत्ता काबीज केली. बाळासाहेब हौसराव गिरमकर , राजेंद्र बापुराव गिरमकर, नानासाहेब रामदास शितोळे, दत्तात्रय भानुदास गायकवाड, अशोक रावसाहेब गिरमकर , बापू रामदास भुजबळ, शर्मीला गजानन जगदाळे, सुदाम भगवान गिरमकर, संगिता पोपट गिरमकर, मधुकर तुकाराम खरात, नवनाथ जालिंदर जाधव यांची निवड झाली आहे. नवनिर्वाचीत सदस्याचे मा.आ. राहुलदादा जगताप पा. यांनी अभिनंदन केले व पुढिल वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी मा.जि.प. सदस्य सुरेशकाका क्षिरसागर, योगेश गिरमकर, सुर्यकांत मोरे, भानुदास कवडे , संतोष क्षिरसागर, बापुराव नांदगुडे, राघुदादा गिरमकर, बाबुराव शिर्के , गणेश गिरमकर , तेजस शिंदे, निलेश गायकवाड, विशाल गिरमकर, पद्मसिंह क्षिरसागर, नारायण जाधव  हे प्रमुख सहकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोठ्या जल्लोषात विजयी उमेदवारांचे स्वागत आनंद उत्सव साजरा करण्यात आला.

 घोडपट्टा केंद्रित
मा. आ. राहुल जगताप यांनी आगामी राजकारण लक्षात घेऊन घोड पट्ट्यात विशेष लक्ष केंद्रित केले आहे. अजनुज सेवा संस्थेत सत्ता मिळवत राहुल जगताप गटाने विरोधकांची बोलती बंद केली.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: