राहुल गांधी यांची खासदारकी रद्द…
काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे

नवी दिल्ली : काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. लोकसभा सचिवालयाने याबाबतचे नुकतेच आदेश जारी केले आहेत.
काँग्रेस नेते राहुल गांधी केरळमधील वायनाड मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले आहेत.
Ahmednagar news:- पैसे घेऊन अश्वीलकृत्ये करण्यास जागा उपलब्ध करून देणार्या कँफेंवर कारवाई
सुरत न्यायालयाने त्यांना 23 मार्चला दोन वर्षांची शिक्षा सुनावल्याने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या 10 जुलै 2013 च्या निकालानुसार हा निर्णय देण्यात आला आहे.देशातील कोणत्याही सक्षम न्यायालयाने कुणाही लोकप्रतिनिधीला किमान दोन किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांची शिक्षा सुनावल्यावर त्याचेसंसद सदस्यत्व त्याच क्षणी रद्द होईल असा निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्याचाच आधार घेऊन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली आहे.
दूध भेसळीवर कारवाई सूत्रधारापर्यंत पोहचण्याचे आव्हान
यामुळे देशभरात कॉंग्रेसकडून आंदोलने सुरु करण्यात आली आहे. या निकालविरोधात अपील केले जाणार आहे. पण आज झालेल्या कारवाईने कॉंग्रेस गटाकडून नाराजी व्यक्त केली जात आह.