या दोन जिल्ह्यात लॉकडाऊन लावा,केंद्रीय टीमचा राज्य सरकारला सल्ला

0

कोल्हापूर – राज्यात फेब्रुवारी महिन्यापासून सुरु झालेल्या कोरोना विषाणूच्या दुसऱ्याला लाटेच्या प्रभावा कमी होताना (corona second way) सध्यातरी दिसत आहे. मात्र राज्यातील काही जिल्ह्यात कोरूना पॉझिटिव रेट जास्त असल्याने परिस्थिती गंभीर बनून आहे.

याच पार्श्वभूमीवर केंद्रीय टीमने पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांच्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला आहे.
केंद्रीय टीमने नुकताच कोल्हापूर (Kolhapur)आणि सांगली(Sangli) या दोन जिल्ह्यांमध्ये जाऊन, त्या ठिकाणची कोरोना परिस्थिती नेमकी कशी आहे याची पाहणी केली असता त्या पाहणीवरून केंद्रीय टीमने कोल्हापूर आणि सांगली या दोन जिल्ह्यांमधील वाढत्या कोरोनाबाधित रुग्णसंख्या वरून आपली चिंता व्यक्त केली आहे.

Porn apps प्रकरण – या व्हाट्सअप चॅटमुळे झाली राज कुंद्राला अटक

Related Posts
1 of 1,153

केंद्रीय टीमने सर्व परिस्थितीचा अभ्यास करत राज्य सरकारला या दोन्ही जिल्ह्यांत संपूर्ण लॉकडाऊन लावण्याचा महत्वपूर्ण सल्लाही दिला आहे. दरम्यान महाराष्ट्रात 10 जिल्हे असे आहेत की, त्याठिकाणी कोरोना पॉझिटीव्ह रेट खूपच जास्त आहे. त्यावरून केंद्रीय टीमने या जिल्ह्यांपैकी काही जिल्ह्यांचा दौरा केला. त्या जिल्ह्यांमध्ये जाऊन कोरोना टेस्टिंग, कॉन्ट्रॅक्ट टेस्टिंग आणि त्याचबरोबर कोरोनाप्रतिबंधक लसीकरण वाढवण्याचा सल्लाही केंद्रीय टीमने दिला असल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: