महाविकासआघाडीला धक्का; नवाब मलिकांना मतदानाची परवानगीबाबत मोठी अपडेट

मुंबई – आज राज्यसभेच्या (Rajya Sabha) सहाव्या जागेसाठी मतदान पार पडत आहे. यातच पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारला (MVA) मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab malik) यांची पुन्हा एकदा उच्च न्यायालयाने मतदानाची परवानगी नाकारली आहे.
काल देखील PMLA न्यायालयाने त्यांना मतदानाची परवानगी नाकारली होती. याच प्रकरणी नवाब मलिक यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. मात्र नवाब मलिक यांच्यासह महाविकास आघाडी सरकारला धक्का दिला आहे.
मात्र नवाब मलिक यांच्या वतीने याचिकेत सुधारणा करून पुन्हा याचिका दाखल करणार असल्याची माहिती मिळतेय. याचिकेतील जामीनाचा मुद्दा काढून केवळ बंदोबस्तात मतदानाची परवानगी देण्याची मागणी मलिक यांच्याकडून करण्यात येणार आहे.