नगरपालिकेच्या गलथान कारभाराची पुण्याई, पाईपलाईन फुटुन लाखो लिटर पाणी रस्त्यावर..

0 12
श्रीगोंदा  :- करोडो रुपये खर्च करुन श्रीगोंदा शहरात पिण्याच्या पाण्याचे पाईपलाईनचे काम सर्वांनी स्वत:चे हात ओले करत ओढुन ताढुन पुर्ण केले. नागरिकांच्या पाण्याची सोय तिसर्या मजल्यावर पुर्ण दाबाने मिळेल असे भाकीत वर्तवले गेले. नागरिक सुध्दा आज ही आशाळभुत नजरेने तिसर्या मजल्यावर पाणी येण्याची अतुरतेने वाट पहात आहेत. परंतु तिसर्या मजल्यावरच काय परंतु जमिनीलगत घरामध्ये सुध्दा पाणी मिळताना दिसत नसल्याचे दृश्य अनेक घरात पहायला मिळत आहे. दुसरीकडे पदाधिकारी स्वत:ची पाठ थोपटुन घेण्यात दंग आहेत.
 सावरकरचौक, गवळीगल्ली हा भाग आता पाण्याच्या दृष्टीने रेडझोन बनला आहे. अनेक महिन्यांपासुन पाण्याचे प्रेशर व्यवस्थित न केल्याने व हालक्या प्रतिचे पाईप वापरल्यामुळे याभागात दररोज पाईप लाईन फुटुन लाखो लिटर पाणी नागरिकांच्या घरात पाईप लाईनने न जाता रस्त्यावर वाहत आहे. अनेक भाग पंधरादिवसापासुन पाण्याविना तळमळत आहेत. परंतु नगरपालिकेला याचे काही सोईरसुतक नसल्याचे दिसते आहे. दुसरीकडे गॅस कनेक्शनच्या नावाखाली सर्व रस्ते व पाण्याचे पाईप फुटले आहेत. त्याचा खर्च डोईजड होतो आहे.

बोठेने सांगितला घटनाक्रम , मात्र हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट.. 

इकडे लोकसंख्या लक्षात न घेता लहान पाईप टाकल्याने नागरिकांना पुर्ण दाबाने पाणी मिळत नाही. याचमुळे हे हलक्या दर्जाचे पाईप सारखे फुटत आहेत. फुटणारे पाईप, त्याची जोडणी व नागरिकांना न मिळणारे पाणी हे कोडे न सुटणारे बनले आहे. हा खर्च सुध्दा नगरपालिकेला न परवडणारा झाला आहे. हात ओले करणारे आता हात वर करुन नामानिराळे झाले आहेत. नाव मात्र नगरपालिकेचे खराब होत आहे. यावर तातडीने उपाययोजना न झाल्यास भविष्यात मोठ्या संकटास या पदाधिकर्यांना जावे लागेल हे वेगळे सांगावयास नको.
Related Posts
1 of 1,292
केलेल्या पाईप लाईनचा हिशोब द्या नाही तर खुर्च्या खाली करा.या आशयाखाली लवकरच आंदोलन छेडल्यास कोणासही जिव्हारी लागायला नको.या आशयाचे पत्र दक्ष नागरिक फाउंडेशन चे अध्यक्ष दत्ता जगताप यांनी काढले आहे.

मागच्या २४ तासात जिल्ह्यात ४५६ नव्या बाधितांची रुग्ण संख्येत भर

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: