पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण  मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल पुण्याचे पोलीस आयुक्त वर्षा वर हजर  

0 10

नवी मुंबई –   ०७ फेब्रुवारी रोजी पुण्यातील हडपसर या परिसरातील एक इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करणारी २२ वर्षीय पूजा चव्हाणचा प्रकरण आता राज्यात चांगलाच तापायला लागला आहे . राज्याची मुख्य विरोधी पक्ष भारतीय जनता पक्षाने या प्रकरणात महाविकास आघाडी सरकरवर टीका करून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे .

राज्यात हा प्रकरण तापल्याने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याची गंभीर दखल घेत  पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना वर्षा निवासस्थानी बोलावून घेतलं आहे. गुप्ता यांनी वर्षावर येऊन पूजा आत्महत्या प्रकरणाच्या तपासाची सर्व माहिती मुख्यमंत्र्यांना दिली. आत्महत्या कशी झाली? प्रत्यक्ष साक्षीदारांच्या नोंदी, मेडिकल रिपोर्ट आदींची अमिताभ गुप्ता यांनी मुख्यमंत्र्यांना दिल्याचं सूत्रांनी सांगितलं.

पूजा चव्हाण प्रकरणात सर्व बाजूंनी तपास सुरू ,पोलीस अधिकाऱ्यांचा मोठा खुलासा

पोलीस आयुक्त गुप्ता यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री वन मंत्री संजय राठोड यांना भेटीसाठी बोलावण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांनी हे प्रकरण गंभीरपणे घेतलं आहे. गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनंतर आता अंतर्गत हालचालींना वेग आला आहे. शिवसेनेचे नेते आणि आघाडीतील इतर नेतेही या प्रकरणी मुख्यमंत्रीच निर्णय घेतील असं सांगत असल्याने मुख्यमंत्र्यांवर दबाव वाढला असून मुख्यमंत्री याप्रकरणी आज दिवसभरात काही ठोस निर्णय घेऊ शकतात, असं सूत्रांनी सांगितलं.

Related Posts
1 of 1,292

गोपीचंद पडळकर यांना अजित पवार यांनी दिला हा उत्तर , म्हणाले पठ्ठ्याचं … 

 तर दुसरी कडे या संदर्भात भाजप महिला आघाडीच्या वतीने पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना निवेदन देण्यात आले आहे. मात्र, या प्रकरणी आठवडा होत आला तरी पोलिसांकडुन अद्याप गुन्हा नोंद करण्यात आलेला नाही. यामध्ये तिच्या नातेवाईकांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. मात्र ते सर्वजण बीड येथे आहेत. तसेच याप्रकरणात तक्रार देण्यात आलेली नाही. त्यामुळे अद्याप पोलिसांनी गुन्हा नोंद केला नसल्याचे पोलिसांकडुन सांगण्यात येत आहे.

राज्यात पुन्हा वाढत आहे कोरोनाचा ग्राफ 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: