DNA मराठी

PUB-G बंद

0 236

नवी दिल्ली: सीमेवर चीनबरोबर झालेल्या गतिरोधकाविरूद्ध पुन्हा एकदा भारत सरकारने अनेक चिनी मोबाइल अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय केला आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार पीयूबीजीसह आणखी ११८ चिनी मोबाइल अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे. यापूर्वी सरकारने चिनी अ‍ॅप्सवर निर्बंध लादले होते. सरकारने अलीकडेच लोकप्रिय अ‍ॅप टिकटोक या अँपसह ५९ अँप्सवर बंदी घातली आहे. नंतर, सरकारने आणखी ४७ अ‍ॅप्सवर बंदी घातली. आज पुन्हा एकदा सरकारने पीयूबीजीसह ११८ अँप्सवर बंदी घातली आहे.

Related Posts
1 of 2,488

आयटी मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशानुसार पीयूबीजी व्यतिरिक्त सरकारने बादू, एपीयूएस लाँचर प्रो सारख्या अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. महत्त्वाचे म्हणजे जूनच्या शेवटी, भारत सरकारने टिकीटॉकसह ५८अँपवर बंदी घातलेली आहे. ज्यात शेअरइट, यूसी ब्राउझर, क्लब फॅक्टरी, हेलो, मी कम्युनिटी, कॅमस्केनर, ईएस फाइल एक्सप्लोरर, यासारखे अनेक अँप्सचा समाविष्ट आहे. नंतर जुलैमध्ये सरकारने आणखी ४७ अँप्सवर बंदी घातली होती . ही सर्व अँप्स अशा काही कामांमध्ये सहभागी असल्याचा सरकारचा दावा आहे, ज्यामुळे देशाचे सार्वभौमत्व आणि अखंडता, देशाची सुरक्षा, राज्याची सुरक्षा आणि सार्वजनिक सुव्यवस्था इत्यादींसाठी धोका निर्माण होऊ शकतो.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: