बेलवंडी येथील प्राथमिक शिक्षकाची मुलगी झाली पीएसआय…

श्रीगोंदा- श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथील प्राथमिक शिक्षक श्री रमेश साबळे सर यांची कन्या ज्योत्स्ना हिची सन 2019 मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत पोलीस उपनिरीक्षक पदी नुकतीच निवड झाली.
ज्योत्स्ना हिचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येळपणे येथे , पाचवी ते दहावी श्री छत्रपती शिवाजी विद्यालय बेलवंडी आणि अकरावी व बारावी विद्याधाम प्रशाला शिरूर, बी टेक ऍग्री अँड टेकक्नॉलॉजी कोल्हापूर यथे शिक्षण पार पडले .
लहानपणापासून अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले होते म्हणून युनिक अकॅडमी पुणे यथे एमपीएससी चे क्लास लावले आणि दोन वर्षे घरीच अभ्यास केला.आई वडील कायम च प्रेरणा देत होते की ज्योत्स्ना नक्कीच आई बापाचे नाव मोठे करील. त्याचेच फळ म्हणून आज ज्योत्स्ना हिने आज हे यश मिळवले.
या निवडीबद्दल जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, माजी व्हा. चेअरमन ज्ञानदेव हिरवे,सरपंच सुप्रियाताई पवार, उपसरपंच उत्तम डाके, व्यापारी पतसंस्थेचे चेअरमन सोपान हिरवे, व्हा.युवराज पवार, सचिव किसन वऱ्हाडे, समता पतसंस्थेचे चेअरमन सुनिल ढवळे,प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटना, छत्रपती शिवाजी विद्यालय प्राचार्य व शिक्षक आदींसह ग्रामस्थांनी अभिनंदन केले व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
लहानपणापासून अधिकारी होण्याचे स्वप्न समोर ठेवले होते.त्यादृष्टीने अभ्यास केला तसेच आई वडिलांचे मार्गदर्शन मोलाचे लाभले. जिद्द व चिकाटी च्या जोरावर ध्येय साध्य केले. – ज्योत्स्ना रमेश साबळे