प्राध्यापकाकडून लैंगिक अत्याचार, विद्यार्थिनीची आत्महत्या, गुन्हा दाखल

0 411

कोइंबतूर –   तामिळनाडू (Tamil Nadu) मधील कोइंबतूर येथे बारावी मध्ये शिक्षण  घेणाऱ्या एका विद्यार्थिनीने आई-वडील घराबाहेर गेले असताना राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या (Suicide)  केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अचानकपणे अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याने परिसरात एकाच खळबळ उडाली आहे. मुलीच्या खोलीतून पोलिसांना एक सुसाईड नोट देखील मिळाला आहे. ज्यामध्ये तिने तीन लोकांची नावे लिहिली आहेत.या सुसाईड नोट मधून धक्कादायक माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. (Professor sexually assaulted, student commits suicide, charges filed)

मिळालेल्या माहितीनुसार या अल्पवयीन मुली अचानक शाळा सोडण्याबाबत बोलू लागली होती. शुक्रवारी ती तिच्या खोलीत फाशी घेतलेल्या अवस्थेत आढळली. पोलिसांनी झडती घेतली असता मुलीच्या खोलीतून एक सुसाईड नोट सापडली आहे. ज्यामध्ये तीन लोकांची नावे तिने लिहिली आहेत. मुलीच्या शाळेतील शिक्षक (Professor)तिचा लैंगिक छळ (sexually assaulted) करत असल्याचा आरोप तिच्या पालकांनी केला आहे. याबाबत तरुणीने तक्रार ही केली होती.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. मुलीचे वडील म्हणाले, ‘माझ्या मुलीने प्राध्यापकाविरोधात तक्रार केली होती, पण त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. मुख्याध्यापकांनीही त्यांची तक्रार गांभीर्याने घेतली नाही आणि त्या प्राध्यापकाने माझ्या मुलीला त्रास देणे सुरुच ठेवले’.

सलमान खान करणार होता अभिनेत्री जुही चावलाशी लग्न, मात्र वडिलांनी…

Related Posts
1 of 1,487

नातेवाईकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी खासगी शाळेतील प्राध्यापकांविरुद्ध आयपीसीच्या दोन कलमांतर्गत पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी शिक्षकाविरुद्ध IPC च्या कलम अंतर्गत 306 आणि POCSO कायद्याच्या कलम 9L R/W कलम 20 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. (Professor sexually assaulted, student commits suicide, charges filed)

हे पण पहा – नऊ ते दहा दिवसात चौकशी पूर्ण करून शासनाला अहवाल दिला जाईल – राधाकृष्ण गमे

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: