प्रियंका गांधींना उत्तर प्रदेश पोलिसांकडून धक्काबुक्की, पहा हा व्हिडिओ

0 316

लखीमपूर – काँग्रेस (Congress) पक्षाचे महासचिव प्रियंका गांधी (Priyanka Gandhi)  यांना लखीमपूर (Lakhimpur)  खेरीला जात असताना उत्तर प्रदेश पोलिसांनी (Uttar Pradesh Police) त्यांचा हात धरत धक्काबुक्की केल्याचा आरोप काँग्रेस पक्षाने केला आहे. प्रियांका गांधी यांना आज पहाटे साडेपाचच्या सुमारास उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली आहे. उत्तर प्रदेश काँग्रेसने प्रियंका गांधींचे कपडे ओढले आणि त्यांचा हात पोलिसांनी मुरडल्याचा आरोप केला आहे. आपला लढा सुरूच ठेवणार असल्याचे पक्षाने म्हटले आहे.

प्रकरण काय 

प्रियंका गांधी आज तिकुनियातील दुर्घटनाग्रस्त कुटुंबांना भेटण्यासाठी जाणार होत्या. आंदोलनकर्ते शेतकरी आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा यांच्यात झालेल्या संघर्षामुळे प्रियंका यांना लखनौमध्येच रोखण्यात आलं आणि त्यांना नजरकैदेत ठेवलं गेलं. मात्र, त्यांनी पायी घरातून बाहेर पडत चालायला सुरुवात केली आणि नंतर कारमधून पुढे निघाल्या. यूपी काँग्रेसच्या ट्विटर हँडलनुसार, लखनौहून लखीमपूर खेरीच्या मार्गावर टोल प्लाझावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता आणि पोलिस रस्त्यावर ट्रक उभे करून कार्यकर्ते आणि माध्यम प्रतिनिधींना रोखत होते.

लखीमपूर खेरीला जाताना प्रियंका गांधी रविवारच्या घटनेबद्दल बोलल्या आणि म्हणाल्या, ज्या प्रकारे या देशात शेतकऱ्यांना तुडवले जात आहे, माझ्याकडे शब्द नाहीत. कित्येक महिन्यांपासून शेतकरी आवाज उठवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण सरकार ऐकायला तयार नाही. आजची घटना दर्शवते की हे सरकार शेतकऱ्यांना तुडवण्याचे राजकारण खेळत आहे. आणि हा देश शेतकऱ्यांचा देश आहे.

 हे पण पहा – श्रीगोंदा तालुक्यात मुसळधार पावसाने शेतीचे नुकसान…

Related Posts
1 of 1,640

त्यांना नजरकैदेत ठेवण्याच्या यूपी पोलिसांच्या आदेशावर प्रतिक्रिया व्यक्त करताना प्रियंका गांधी म्हणाल्या, मी घराबाहेर पडून गुन्हा करत नाही. मला फक्त प्रभावित कुटुंबांना भेटायचे आहे आणि त्यांचे दुःख समजून घ्यायचे आहे. मी काय चूक करत आहे? आणि जर मी काही चूक केली असेल, तर तुम्हाला [यूपी पोलीस] ऑर्डर, वॉरंट असायला हवे. तुम्ही [यूपी पोलीस] मला थांबवत आहात, पण कोणत्या कारणासाठी?

Corona-आज पासून पुन्हा कडक लॉकडाऊन, फक्त किराणा दुकाने सुरू राहणार

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: