प्राचार्य व शिक्षकांचा उपक्रम , ल. ना. होशिंग विद्यालयात पक्ष्यांसाठी पाणी व धान्याची व्यवस्था

0 10
जामखेड –   उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे प्राणी व पक्षांचे धान्य व पाण्यासाठी हाल होत आहेत. याच विचारातून ल. ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्रीकांत होशिंग यांनी शिक्षकांच्या सहभागातून शाळेच्या प्रांगणात असलेल्या झाडांवर धान्य व पाण्याची व्यवस्था केली आहे. विद्यार्थ्यांनी आपआपल्या घराच्या परिसरात व झाडावर व्यवस्था करण्याचे आवाहन केले आहे.
ल. ना. होशिंग विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्रीकांत होशिंग यांनी कला शिक्षक मुकूंद राऊत, हरीत सेना विभाग व विज्ञान विभागप्रमुख बबनराव राठोड, रवींद्र निकाळजे, उपमुख्याध्यापक श्रीधर जगदाळे, पर्यवेक्षक रमेश आडसूळ, शिक्षक प्रतिनिधी पोपट जगदाळे, समारंभ प्रमुख संजय कदम, ज्येष्ठ शिक्षक बाळासाहेब पारखे, अनिल होशिंग, अर्जुन रासकर, सुभाष बोराटे, रोहित घोडेस्वार, विशाल पोले, भागवत सुपेकर,  हनुमंत वराट, नरेंद्र डहाळे, किशोर कुलकर्णी, विजय शिरसागर,साईप्रसाद भोसले, राघवेंद्र धनलगडे, उमाकांत कुलकर्णी,स्वप्नील जाधव,निलेश भोसले, अविनाश नवगिरे, सुरज गांधी, अमित सांगळे, विनोद उगले, भाऊसाहेब शेटे , सावंत भाऊसाहेब, ग्रंथपाल संतोष देशमुख, हनुमंत वराट, प्रमोद बारवकर उपस्थित होते यावेळी प्राचार्य श्रीकांत होशिंग यांनी उन्हाची वाढती तीव्रतामुळे पशुपक्षांची अन्न व पाण्यावाचून हाल होऊ नये यासाठी काय  व्यवस्था करता येईल व विद्यार्थ्या मार्फत हा प्रयोग करून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये पक्षांविषयी संवेदनशीलता व पर्यावरणाविषयी आपुलकीची भावना तयार करण्याच्या दृष्टीने निर्णय घेण्यात आला व तशी व्यवस्था विद्यालयाच्या प्रांगणातील झाडावर करण्याचे नियोजन आले.
याबाबत बोलताना प्राचार्य श्रीकांत होशिंग म्हणाले, बऱ्याच ठिकाणी पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे आपण अनेक वेळा ऐकल आहे की पक्षी पाण्याविना मरून पडलेले आहेत. त्यांच्यावर अशी वेळ येऊ नये यासाठी सामाजिक भावनेतून आपण सगळ्यांनीच सामाजिक काहीतरी देणं लागतो या भावनेतून स्वतः वेळ काढून घराच्या छतावर झाडांना एखादी छोटी वस्तू किंवा नुसते प्लेटमध्ये जरी धान्य ठेवलं व पाणी ठेवले, तरी पक्ष्यांची चांगली व्यवस्था होईल व त्यांचे हालअपेष्टा होणार नाही.
Related Posts
1 of 1,290
हाच संदेश देण्यासाठी शाळेच्या वतीने  पाच लिटर प्लास्टिकचा ड्रम घेतला तो मधल्या बाजूने कट केला खालच्या भागांमध्ये पाणी साठवल जाईल व समोरून खराब झालेल्या कंपासचा तुकडा जोडला त्याच्या मध्ये धान्य ठेवता येईल. पाणी व धान्य एकाच ठिकाणी पक्षाला खायला प्यायला मिळेल अशा पद्धतीने तयार करून सोशल डिस्टन्स पाळून शाळेमध्ये ते विद्यार्थ्यांच्या मदतीने विविध ठिकाणी झाडांना लावण्यात आले. या कृतीमुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये पर्यावरणाविषयी व पक्षी यांच्याबद्दल आवड निर्माण होईल यात शंका नाही.

देशात स्थापन होणार तिसरी आघाडी , शरद पवार यांनी दिले संकेत 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: