पंतप्रधान देशाच्या जनतेने तुम्हाला कोणती शिक्षा द्यावी? – नवाब मलिक

0 206

 नवी मुंबई –   देशातून  भ्रष्टाचार (Corruption) संपवण्याच्या उद्देशातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी ८ नोव्हेंबर २०१६ (November 8, 2016) रोजी रात्री आठ वाजता देशाला संबोधन करत  पाचशे आणि हजारच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला आज पूर्ण पाच वर्ष झाली आहे. मात्र देशात भ्रष्टाचार  संपला नाही. यावरूनच मागच्या काही दिवसांनी चर्चेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) चे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. (Prime Minister, what punishment should the people of the country give you? – Nawab Malik)

मोदी सरकारच्या या निर्णयावर बोलताना नवाब मलिक म्हणाले नोटबंदीमुळे संपूर्ण देशात हाहाकार माजला होता. नोट बदलण्यासाठी लोकांना रांगेत उभं राहावं लागलं होतं, अनेकांचा त्यात मृत्यू झाला आणि त्यानंतर मोदीजी म्हणाले होते की, मला तीन महिन्यांचा वेळ द्या. पण पाच वर्षे झाली ना काळा पैसा नष्ट झाला ना भ्रष्टाचार, ना दहशतवाद संपला. पण नोटबंदीमुळे बेरोजगारी वाढली. नोटबंदीच्या निर्णयामुळे देशाची अर्थव्यवस्था हादरली. आज या निर्णयाला पाच वर्षे झाली. मोदीजी, तुम्ही त्यावेळी म्हणाला होता मला भर चौकात शिक्षा द्या. मोदीजी, आम्ही विचारत आहोत की तो कोणता चौक आहे आणि देशाच्या जनतेने तुम्हाला कोणती शिक्षा द्यावी? अशी टीका नवाब मलिक यांनी आज माध्यमांशी बोलताना केली आहे.
Related Posts
1 of 1,635
तर दुसरीकडे नवाब मलिक यांनी पुन्हा  समीर वानखेडे (Sameer Wankhede)  आरोप केला असून यावेळी त्यांनी  आता वानखेडेंची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर (Actress Kranti Redkar) वर निशाणा साधला आहे. क्रांती रेडकरच्या बहिणीवर पुण्यात ड्रग्ज (Drugs) ची केस नोंदवलेली आहे, पुण्यात ड्रग्जचं प्रकरण प्रलंबित असल्याचा दावा मलिक यांनी केला आहे.  (Prime Minister, what punishment should the people of the country give you? – Nawab Malik)
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: