पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर मोठा निर्णय

0 460
Prime Minister Narendra Modi's big decision on Afghanistan issue

नवी दिल्ली-   अफगाणिस्तान (Afghanistan) मध्ये तालिबान (Taliban) ने पुर्ण नियंत्रण मिळवल्यानंतर आता अफगाणिस्तानमध्ये तालिबान ने आपली हंगामी सरकारची स्थापना केली आहे. तर दुसरीकडे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत ( United Nations Security Council)  ठराव मंजूर करुन अफगाणिस्तानची जमीन इतर कोणत्याही देशाविरुद्धच्या कारवाईसाठी वापरू नये अशी मागणी करण्यात आली आहे. हा ठराव मंजूर करण्यात भारताने मध्यवर्ती भूमिका बजावली असुन ५ स्थायी आणि १० अस्थायी सदस्य असलेल्या संघटनेने हा ठराव संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत मंजूर केला आहे.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत तालिबानच्या सरकारने संयुक्त राष्ट्रला दिलेल्या सर्व आश्वासनांची पूर्तता केली पाहिजे आणि अफगाणिस्तानची जमीन कोणत्याही देशाविरुद्ध वापरली जाणार नाही याची देखील खात्री करावी अशी प्रतिक्रिया संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने दिली आहे.

हे पण पहा – वॉर्ड बॉयची रुग्णाच्या नातेवाईकांना शिवीगाळ करत धक्काबुक्की  

Related Posts
1 of 2,139

 त्यानंतर आता अफगाणिस्तानमधील बदलती परिस्थिती पाहता भारताच्या तात्कालिक प्राधान्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi)  यांनी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक टास्क फोर्स तयार केली आहे. भारताचे मुख्य प्राधान्य हे अफगाणिस्तानमध्ये अजूनही अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुरक्षित बाहेर काढणे हे आहे. अफगाणिस्तान आता पूर्णपणे तालिबानच्या ताब्यात असल्याने भारत आणि अफगाणिस्तान मागच्या दोन दशकांपासून पायाभूत सुविधा आणि मनुष्यबळामध्ये प्रचंड गुंतवणूकीसह खूप जवळचे भागीदार आहेत. हे पॅनेल गेल्या काही दिवसांपासून नियमितपणे बैठक घेत आहे. हे अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षित आणणे, अफगाण नागरिकांचा (विशेषत: अल्पसंख्यांक) भारतात प्रवास यासाठी प्रयत्न करत आहे.

साकीनाका बलात्कार प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: