DNA मराठी

उद्यापासून पाच दिवस अहमदनगर जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश – जिल्हाधिकारी

0 460
Preventive order in Ahmednagar district for five days from tomorrow - Collector

 

अहमदनगर –  रमजान ईद व अक्षयतृतीया या सणांच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ ( १ )  अन्वये जिल्हाधिकारी (Collector) डॉ.राजेंद्र भोसले (Dr. Rajendra Bhosale) यांच्या आदेशानुसार १ ते ५ मे २०२२ या कालावधीत अहमदनगर शहर व जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत.

अहमदनगर शहर व जिल्ह्यात ३ मे २०२२ रोजी रमजान ईद व अक्षयतृतीया हे सण / उत्सव साजरे केले जाणार आहेत. सदर उत्सवाच्या दरम्यान गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच जिल्हयामध्ये विविध राजकीय पक्ष कामगार संघटना तर्फे त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मोर्चा, धरणे आंदोलने, रास्ता रोको होतात. त्याचप्रमाणे सध्या जिल्हयात यात्रा उत्सव तसेच धार्मिक कार्यक्रम साजरे होतात त्यावेळी मोठया प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

वरील पार्श्वभूमीवर जिल्हयात कोणत्याही किरकोळ घटना वरुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये किंबहुना तशी परिस्थिती निर्माण झाल्यास ती हाताळण्यासाठी पोलीसांना मदत व्हावी म्हणून संपूर्ण अहमदनगर शहर व जिल्ह्यात १ मे ते ५ मे २०२२ या कालावधीत महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) चे प्रतिबंधात्मक आदेश जारी जारी करण्यात आले आहेत.

Related Posts
1 of 2,530

प्रतिबंधात्मक आदेश असताना शस्त्रे, काठया, सोटे तलवारी भाले, सुरे, बंदुका, दंडे अगर लाठया किंवा शारिरीक इजा करणेसाठी वापरता येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे., दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे व साधने जवळ बाळगणे किंवा तयार करणे किंवा जमा करणे., कोणत्याही व्यक्तींच्या आकृत्या किंवा त्यांच्या प्रतिमेचे प्रदर्शन करणे., कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक जवळ बाळगणे किंवा तयार करणे, जाहीरपणे घोषणा देणे, गाणे म्हणणे, वाद्य वाजविणे ध्वनिवर्धक किंवा ध्वनीक्षेपक यासारखे मानवी आवाजाचे वर्धन करणारा किंवा तो जसाच्या तसा ऐकवणारा उपकरण संच वापरणे किंवा वाजवणे, सभ्यता अगर नितीमत्ता यास धक्का पोहचेल किंवा शांतता धोक्यात येईल असे कोणतेही कृत्य करणे, आवेशपूर्ण भाषणे करणे, हावभाव करणे किंवा सोंग आणणे अगर तशी चित्रे, चिन्हे किंवा इतर वस्तू तयार करणे किंवा त्यांचा प्रचार करणे यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

सदर प्रतिबंधात्मक आदेश आदेश खालील व्यक्तींना लागू होणार नाहीत. त्यामध्ये शासकीय सेवेतील व्यक्तींना ज्यांना आपले वरिष्ठांचे आदेशानुसार कर्तव्य पुर्तीसाठी हत्यार जवळ बाळगणे आवश्यक आहे, तसेच ज्या व्यक्तींना शारिरीक दुर्बलतेच्या कारणास्तव लाठी अगर काठी वापरणे आवश्यक आहे. असेही जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी प्रतिबंधात्मक आदेशात नमूद केलं आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: