“या” कारणाने भाजपचा देगलूरमध्ये पराभव प्रवीण दरेकरांनी सांगितलं कारण

0 267

नवी मुंबई –    संपूर्ण लक्ष लागून राहिलेल्या नांदेड (Nanded) जिल्ह्यातील देगलूर  विधानसभेच्या (Deglaur Assembly By-election) पोटनिवडणूकीचा निकाल ३ नोव्हेंबर रोजी लागला. या निवडणुकीत काँग्रेस (Congress) ने भाजपाला (BJP) धक्का देत जोरदार विजय मिळवला आहे. काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर (Jitesh Antapurkar) यांनी भाजपाच्या सुभाष साबणे (Subhash Sabne) यांचा जवळपास ४२ हजार मतांनी पराभूत करत एक दणदणीत विजय मिळवला आहे. (Praveen Darekar said that the defeat of BJP in Deglaur was due to “this”)

या निकालानंतर महाविकास आघडीकडून (MVA) माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) आणि विजयी उमेदवार जितेश अंतापूरकर यांना शुभेच्छा देण्यात येत आहे.  महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या विजयानंतर भाजपवर टीका देखील केली आहे. तर दुसरीकडे विधानपरिषद विरोधी पक्षनेते  प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी  भाजप या निवडणुकीत पराभव का झाला या बद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे. मुस्लीम समाजाने भाजपच्या द्वेषापोटी मते केली, असा दावा दरेकर यांनी केला आहे.

प्रवीण दरेकर म्हणाले की  पंढरपुरात ताकदीने लढलो त्याचप्रमाणे देगलूरलाही लढलो. निवडणुकीत विजय-पराभव होत असतो. त्याला अनेक कारणे असतात. गेल्यावेळी शिवसेना-भाजपला मते पडली होती त्याच्यापेक्षा जास्त मते यावेळी भाजपच्या उमेदवाराला पडली आहेत. निवडणुकीत मुस्लीम समाजाने भाजपच्या द्वेषापोटी मतदान केले. तसेच वंचित बुहजन आघाडी २५ हजाराचे मत देईल, असा मला वाटले होते. पण पराभव हा पराभव असतो. तो आम्ही खुल्या मनाने स्वीकारला आहे, असे दरेकर यांनी सांगितले.

दरम्यान, पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजपने विजय मिळवल्यानंतर महाविकास आघाडी समोर देगलूर-बिलोली पोटनिवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. या पोटनिवडणुकीत सुभाष साबणे यांनी भाजप, तर दिवंगत रावसाहेब अंतापूरकर यांचा मुलगा जितेश यांनी महाविकास आघाडीतर्फे निवडणूक लढवली. जितेश यांनी साबणे यांच्यावर तब्बल ४१ हजार ९३३ मतांनी विजय मिळवल आहे .  देगलूर पोटनिवडणुकीत पराभव झाल्यानंतर भाजप उमेदवार सुभाष साबणे यांनी आम्हाला निकाल मान्य आहे. जनतेने दिलेला कौल आम्ही विनम्रपणे स्वीकारतो. तसेच काय चुका झाल्या यावर विचार करुन पुढच्या निवडणुकीसाठी जोमाने कामाला लागू, अशी प्रतिक्रिया दिली होती. (Praveen Darekar said that the defeat of BJP in Deglaur was due to “this”)

हे पण पहा –  बेकायदेशिर बायो डिझेलची विक्री करणाऱ्या अकरा आरोपींना अटक

Related Posts
1 of 1,608
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: