प्रशांत किशोर यांची राहुल गांधींना फोन; अनेक चर्चांना उधाण

0 203
Prashant Kishor calls Rahul Gandhi; Many discussions abound

 प्रतिनिधी – DNA मराठी टीम

 मुंबई –  देशातील पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा (Assembly elections) निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या निकालामध्ये देशातील सर्वात जुना पक्ष असणाऱ्या काँग्रेसला (Congress) जोरदार धक्का बसला असून आता पक्षात अनेक नेते प्रश्न उपस्थित करत आहे. यातच डिसेंबर २०२२ मध्ये देशातील आणखी एक महत्वाचा राज्य असणारा गुजरात (Gujarat) राज्याच्या विधानसभासाठी निवडणूक होणार आहे. त्यामुळे काँग्रेसने या निवडणुकीसाठी आता पासूनच तयारी सुरू केल्याची माहिती समोर येत आहे. निवडणुकीच्या तयारीसाठी पुन्हा एकदा प्रशांत किशोर (Prashant Kishor) काँग्रेससाठी रणनीती करणार असल्याचं बोललं जात आहे.प्रशांत किशोर यांनीच राहुल गांधींशी (Rahul Gandhi) याबाबत सविस्तर चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. (Prashant Kishor calls Rahul Gandhi; Many discussions abound)

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी स्वत: राहुल गांधींशी चर्चा करून गुजरात निवडणुकांसाठी काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र, प्रशांत किशोर नेमके किती काळासाठी पक्षासोबत राहतील, याविषयी अद्याप नेमकी माहिती मिळू शकलेली नाही. प्रशांत किशोर यांनी फक्त गुजरात निवडणुकांपुरतंच काँग्रेससाठी काम करणार असल्याचा प्रस्ताव राहुल गांधींशी बोलताना ठेवल्याचं सांगितलं जात आहे. यासंदर्भात अंतिम निर्णय काँग्रेस हायकमांडकडून घेतला जाणार आहे. गुजरात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या काँग्रेसच्या बैठकीमध्ये यावर चर्चा केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

Related Posts
1 of 2,357

मागच्या वर्षी देखील निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू होती.मात्र काही कारणाने प्रशांत किशोर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश झाला नव्हता. त्यानंतर प्रशांत किशोर यांनी ममता बॅनर्जींसाठी निवडणुकीचं नियोजन केलं आणि काँग्रेसनं प्रशांत किशोर यांच्याच एका सहकाऱ्यासोबत चर्चा सुरू केली होती . (Prashant Kishor calls Rahul Gandhi; Many discussions abound)

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: