आदर्श ग्रामविकास अधिकारी सुदामराव बनसोडे यांच्या सेवापूर्तीबद्दल देवगड येथे संत महंतांच्या हस्ते गौरव

0 62

 

नेवासा- आदर्श ग्रामविकास अधिकारी श्री सुदामराव बनसोडे यांच्या सेवापूर्तीबद्दल श्री क्षेत्र देवगड येथे संत महंतांच्या हस्ते त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. सुदामराव बनसोडे यांनी ज्ञानदानासह ग्रामसेवेचे केलेले पवित्र कार्य हे कौतुकास्पद असल्याचे गौरवोदगार श्री क्षेत्र देवगड दत्त पिठाचे महंत गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांनी यावेळी बोलतांना काढले.
नेवासा तालुक्यातील आदर्श ग्रामविकास अधिकारी
सुदामराव बनसोडे हे 31 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले.

 

यावेळी श्री क्षेत्र देवगड येथील कल्याण सभामंडपात झालेल्या सेवापूर्ती गौरव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज हे होते.सदगुरू नारायणगिरी महाराज आश्रमाचे प्रमुख हभप गुरुवर्य श्री उद्धवजी महाराज मंडलिक,श्री क्षेत्र देवगड संस्थानचे उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज,संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर देवस्थानच्या विश्वस्त कमिटीचे अध्यक्ष पांडुरंग अभंग,श्री मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर कारखान्याचे संचालक काशिनाथ अण्णा नवले,नागेबाबा पतसंस्थेचे अध्यक्ष कडूभाऊ काळे,तुकाराम मिसाळ,पाचेगावचे सामाजिक कार्यकर्ते दिलीप पवार, शिक्षक रामदास कोरडे सर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

 

यावेळी ग्रामसेवक संघटनेचे माजी अध्यक्ष भाऊसाहेब भांड सर यांनी प्रास्ताविक केले.प्रेस क्लबचे अध्यक्ष पत्रकार सुधीर चव्हाण यांनी संत महंतांसह आलेल्या प्रमुख मान्यवरांचे स्वागत केले.यावेळी ३१ वर्षाच्या उत्कृष्ट सेवाकार्याबद्दल ग्रामविकास अधिकारी सुदामराव बनसोडे व सौ.रत्नमाला बनसोडे यांचा गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज व हभप श्री उद्धव महाराज मंडलिक यांच्या हस्ते सत्काराद्वारे गौरव करण्यात आला.

 

Related Posts
1 of 2,177

यावेळी बोलतांना गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज म्हणाले की ग्रामविकास अधिकारी म्हणून गाव तेथे प्रगती अशी सेवा करत असतांना सर्वांना बरोबर घेऊन सुदामराव बनसोडे यांनी केलेले कार्य हे कौतुकास्पद आहे.अशा व्यक्तींची समाजाला खरी गरज असून त्यांनी यापुढे समाज हिताचे काम करावे असे शुभाशीर्वाद दिले.

 

यावेळी श्री दत्त मंदिर संस्थान गोदावरी ग्रुप,प्रेस क्लब नेवासा, बकुपिंपळगाव,मुरमे, ग्रामपंचायत,नगर येथील मित्र परिवार,विविध संस्थासह नेवासा तालुक्यातील मित्र परिवाराच्या वतीने सत्कार करून गौरविण्यात आले. प्रमुख अतिथींनी देखील आपल्या भाषणाद्वारे ग्रामविकास अधिकारी सुदामराव बनसोडे यांच्या कार्याचे कौतुक केले.
सत्काराला उत्तर देतांना सुदामराव बनसोडे म्हणाले की सर्वांनी दिलेली साथ तसेच संतांची असलेली कृपादृष्टी यामुळेच मी जीवनात ग्रामविकास अधिकारी म्हणून यशस्वीपणे काम करू शकलो.

 

छत्रपती शिवाजीराजे ग्रामसेवक पतसंस्थेचा चेअरमन म्हणून जबाबदारी यशस्वीपणे पार पडली,ठेवीही वाढल्या संस्थेला उत्कर्षाकडे नेले याचे समाधान वाटते हे सर्वांच्या प्रेमाचे प्रतिक असल्याचे सांगून त्यांनी सर्वांना धन्यवाद दिले.पत्रकार सुधीर चव्हाण यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर इंजिनियर सुनीलराव वाघ यांनी उपस्थित मित्र परिवार विविध संस्थेचे पदाधिकारी यांचे आभार मानले.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: