अहमदनगर शहरात भारनियमन सुरू; जाणुन घ्या तुमच्या भागात कधी होणार बत्ती गुल..

अहमदनगर – देशातील बहुतेक राज्यात आता वीज संकट (Power crisis)वाढला आहे. राज्यात देखील वीज संकट वाढतच आहे. यामुळे राज्यातील बहुतेक भागात आता भारनियमन सुरू झाला आहे. अहमदनगर शहरात (Ahmednagar city) देखील भारनियमन सुरू झाला आहे. काही दिवसांपासून जिल्ह्यासह अहमदनगर शहरात अघोषित भारनियमन सुरू होते. त्यामुळे नागरिकांना अडीअडचणीचा सामना करावा लागत होता. मात्र आता महावितरणाकडून आज गुरुवार पासून नियमित भारनियमन सुरु करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार आता शहर व ग्रामीण भागात फिडरनिहाय दोन टप्प्यात अडीच ते पाच तासांचे भारनियमन केले जाणार आहे.
बुधवारी सायंकाळी महावितरणच्या वरिष्ठ कार्यालयाकडून भारनियमनाचे आदेश आल्याने त्यानुसार येथील मंडल कार्यालयाकडून फिडरनिहाय वेळापत्रक तयार केले. यात शहरी भागात पहाटे ४ पासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत विविध टप्प्यात भारनियमन होणार आहे.
असे असेल भारनियमनाचे वेळापत्रक
ग्रुप सी १ (स. ११ ते १२.३० व दु, ४ ते ५) – बुन्हाणनगर, देवी रोड, अळकुट जीपीओ.
ग्रुप सी २ (स. १० ते १२ व दु. २.३० ते ४) कादंबरीनगर, निर्मल – सिव्हिल, मार्केट यार्ड.
ग्रुप डी १ (स. ११ ते १ व दु. ५ ते ६) – बोल्हेगाव, सारसनगर, मल्हार चौक, जातेगाव, निघोज
ग्रुप डी २ (स. १०.३० ते १२ व दु ३,३० ते ५) – सिद्धिविनायक, गुलमोहोर, गंजबाजार, स्टेशन रोड, माळीवाड
ग्रुप ई १ (स. ५ ते ७ व स. १०.३० ते १२) – सावेडी गाव, प्रोफेसर चौक, भि भूषणनगर, नागरदेवळे, आलमगीर ग्रुप ई २ (स. ४ ते ६ व दु, १२ ते १.३०) शिवाजीनगर, बालिकाश्रम, अशोका, दरेवाडी, केडगाव, वडनेर, सोनेवाडी एफ १ (स. ४.४० ते ६.३० व दु. ३५१-कान्हूर, पिंपळगाव, पोखर्डी.
एफ २ (स. २.३० ते ४.३० व दु. १.३० ते ३.३०) – लालटाकी, खारेकर्जुने, आठवड.
जीए (स. २.३० ते ४.३० व साथ, ६.४५ ते ९) – राळेगणसिद्धी, कुरूंद, शहापूर, अकोळनेर, घोसपुरी
जीबी (सु. ४.३० ते ६.३० व रात्री ९.४५ १२) फकिरवाडा, नवनागापूर, भाळवणी, शेंडी, अरणगाव रोड.