25 वर्षपासून प्रलंबीत कुकडी भूसंपादन प्रश्न मार्गी – मा. आ.राहुल जगताप

0 288
Rs 17.00 crore sanctioned for construction of 21 dams in Shrigonda taluka - Rahul Jagtap
श्रीगोंदा –  कुकडी प्रकल्पासाठी जमिनींचे भूसंपादन झालेल्या मौजे चांडगाव ता.श्रीगोंदा या गावांतील शेतकऱ्यांना माजी आमदार राहूल जगताप (Rahul Jagtap) यांच्यामुळे राज्य शासनाकडून तब्बल 8 कोटी 90 लाख 53 हजार 154 रुपयांचा निधी दि.31मार्च 2022 रोजी मंजूर करण्यात आलेला आहे. यात चांडगाव येथील 480 भूसंपादनग्रस्थ  शेतकऱ्यांचा  भूसंपादन प्रश्न मार्गी लागलेला असून यात तब्बल 20 हेक्टर जमीन कृष्णा खोरे महामंडळाकडे वर्ग होणार आहे.
कुकडी प्रकल्पासाठी वितरिका क्र 13 लघुवितारीक 6,7,8,10,11 साठी हा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.  तरी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यलयास राज्य शासनाकडून विवरणपत्रानुसार रक्कम तात्काळ जमा करण्यात आलेली असून जेणेकरून अंतिम निवडा जाहीर करण्यासाठी पुढील कार्यवाही सोयीस्कर झालेली आहे. सदरचा मौजे चांडगाव येथील प्रस्ताव 25 वर्षपासून प्रलंबित असल्या कारणाने 31 मार्च 2022 या तरखेपर्यंतच्या व्याजासह संबंधित यंत्रणेकडून परिगणना करण्यात आलेली असून त्यानुसार  संबंधित कार्यलयास  निधी जमा करण्यात आलेला आहे.

शेतकऱ्यांच्या जमिनींचे भूसंपादन झाले खरे. मात्र, मागील 25 वर्षांपासून शेतकऱ्यांना मोबदल्याचे पैसे मिळाले नव्हते. माजी आमदार जगताप यांनी कुकडी प्रकल्पाचा अभ्यास करून  शेतकऱ्यांकडून होत असलेल्या मोबदल्याच्य मागणीसाठी संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन शासनदरबारीही पाठपुरावा केला. त्यामुळे अनेक वर्षांपासून अडकून पडलेली रक्कम आता शेतकऱ्यांना मिळनार आहे.

 मोबदल्याचा पैसा जेव्हा शेतकऱ्यांच्या हातात येतो, तेव्हा शेती व मुलांच्या शिक्षणाबरोबरच त्यांची प्रगती साधली जाते. व्यापार-उद्योगाला चालना मिळते. ही रक्कम मिळवून देण्यासाठी उपमुख्यमंत्री मान.ना. श्री. अजितदादा पवार साहेब, जलसंपदामंत्री मान. ना. श्री. जयंतरावजी पाटील साहेब, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले साहेब, उपजिल्हाधिकारी उज्वला गाडेकर मॅडम, कार्यकारी अभियंता रामदास जगताप व परिश्रम घेतलेल्या सर्व अधिकाऱ्यांचा मी आभारी आहे. तसेच सर्वांचे मनःपुर्वक अभिनंदन.
 
कुकडी भूसंपादन प्रश्न मार्गी लावण्यासाठी मा.आ राहुल जगताप यांच्या माध्यमातून वेळोवेळी पाठपुरवठा करून सदर निधी मिळवण्यास आम्हास यश आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा जीवहळ्याचा प्रश्न मार्गी लागला असून शेतकरी समाधानी आहे – सोमनाथ म्हस्के 
Related Posts
1 of 2,357

सोमनाथ म्हस्के यांनी सर्व शेतकऱ्यांना एकत्रित करून वेळोवेळी कागदपत्रांची पूर्तता करत शासन दरबारी मा.आ.राहुलदादा जगताप यांच्या माध्यमातून चांडगाव कुकडी भूसंपादीत मोबदला मिळवण्यासाठी प्रयत्न केले.त्यास यश आले असून मा.आ.राहुल जगताप यांचे मी आभार मानतो. – सरपंच पती रवींद्र म्हस्के , चांडगाव
सरपंच पती नेमके कोणत्या पार्टीचे ?
श्रीगोंदा तालुक्यातील चांडगाव येथील सरपंच मनीषा म्हस्के यांचे पती रवींद्र म्हस्के हे माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या जवळचे कार्यकर्ते समजले जातात पण ते चक्क माजी आमदार राहुल जगताप यांचे आभार मानतात मग रवींद्र म्हस्के नेमके कोणत्या पार्टीचे आहे असा प्रश्न तालुक्यातील नागरिकांना पडला आहे.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: