सैनिक बँकेतील सभासद वाढिला पूर्ण चौकशी होईपर्यंत स्थगिती

0 134
अहमदनगर :-  सैनिक बँकेतील चेअरमन  शिवाजी व्यवहारे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोरडे व काही संचालक,कर्मचाऱ्यांनी येणाऱ्या निवडणुकीत आपलाच पॅनल निवडून यावा हा उद्देश ठेवत व बँकेचा पोटनियमाचे उल्लंघन करत एकाच दिवशी तब्बल१४०५ नातेवाईक सभासद केले होते याविरुद्ध सैनिक बँकेचे सभासद बाळासाहेब नरसाळे, विनायक गोस्वामी,सुदाम कोथिंबीरे,संपत सिरसाठ,बबन दिघे,यांनी सैनिक बँक संस्थापक तथा जेष्ठ समाजसेवक आण्णासाहेब हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार मंत्र्याकडे अपील दाखल केले होते.(Postponement of Sainik Bank member increase till full inquiry)
म.स.सं अधिनियम १९६० च्या कलम १५४ अन्वये पुनरिक्षण अर्जावर सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या पुढे १३ जुलै २०२१ ला सहकार खात्याचे आधिकारी, बँक आधिकारी, व तक्रारदार बाळासाहेब नरसाळे व तक्रारदार यांच्या वतीने विधितज्ञ आयेशा केशोडवाला  यांची एकत्रित सुनावणी झाली होती.सैनिक बॅंक कर्मचारी,चेअरमन व काही संचालकांनी निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन व बँकेच्या पोटनियमाचे व कायद्यातील तरतूदीचे उल्लंघन करत नियमबाह्य सभासद केल्याचा युक्तिवाद  विधीतज्ञ आयेशा केशोडवाला,व बाळासाहेब नरसाळे यांनी केला.
सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सदर मुद्यावर व कायदा व बँक पोटनियमाचे अवलोकन केले असता असा निष्कर्ष काढला की बँकेने केलेली सभासद वाढ ही कायद्यातील तरतूद व बँकेच्या उपविधीचे उल्लंघन करत  बेकायदेशीरपणे केली आहे.त्यामुळे बेकायदेशीर झालेल्या सभासदांना  पूर्ण चौकशी होईपर्यंत स्थगिती दिली असून पुढील सुनावणी २१.९.२०२१  रोजी ठेवण्यात आली आहे.सैनिक बँकेत सत्ताधाऱ्यांनीं लोकशाहीचा अवमान करत बेकायदा,नियमबाह्य सभासद प्रक्रिया राबवून लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम केले होते. “हम करे सो कायदा” अशा प्रकारची निती संचालक मंडळाने अवलंबली होती मात्र सहकार मंत्र्यांनी स्थगिती देऊन सत्ताधाऱ्याच्या या नीतीला पायबंद घातला आहे.
Related Posts
1 of 1,481

 बँक कर्मचाऱ्यांच्या मनसुब्यावर पाणी!

सैनिक बँकेच्या संचालक मंडळाची आगामी  निवडणूक डोळ्यासमोर ठेवत व केलेल्या गैरकारभार दडपण्यासाठी चेअरमन शिवाजी व्यवहारे,  संजय तरटे, शिवाजी सुकाळे, नामदेव काळे मुख्यकार्यकारी आधिकारी संजय कोरडे,अनिल मापारी, रमेश मासाळ, संतोष भनगडे,आप्पा थोरात,राजेंद्र ढवण, आकाश काकडे,बबन फंड,भरत पाचारणे, सदाशिव फरांडे या कर्मचाऱ्यांनीं १४०५ नातेवाईकांना सभासद केले  मात्र सहकार मंत्र्यांनी स्थगिती दिल्याने चेअरमन, मुख्य कार्यकारी आधिकारी,व कर्मचाऱ्यांच्या मनसुब्यावर पाणी फिरले आहे.

निवडणुकीत मतदानाचा अधिकार सर्व सभासदांना!

सहकारी संस्थांच्या निवडणुकीत आता सर्वांनाच मताधिकार राहील. ९७ व्या घटना दुरुस्तीनुसार क्रियाशील सभासदांनाच मताचा अधिकार हाेता. परंतु कोविडमुळे ३१ मार्च २०२२ पूर्वी हाेणाऱ्या सर्व संस्थांच्या निवडणुकीत क्रियाशील अथवा अक्रियाशील हे निकष राहणार नाहीत, असे राज्य शासनाने स्पष्ट केले  आहे. शासनाच्या या निर्णयामुळे चालू वर्षी होणाऱ्या निवडणुकीत बँकेच्या स्थापनेत महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या १० हजार १२० सभासदांना त्यांचा मतदानाचा हक्क अबाधित राहील असे सैनिक बँक सभासद बाळासाहेब नरसाळे, कॅप्टन विठ्ठल वराळ, संपत शिरसाठ,मारुती पोटघन,विनायक गोस्वामी विक्रमसिंह कळमकर यांनी सांगितले.(Postponement of Sainik Bank member increase till full inquiry)

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: