IPL 2022 ‘ती’ कामगिरी पाहता शमीसाठी अमेरिकन पॉर्नस्टारने केला पोस्ट; म्हणाली…

0 382
Posted by American Pornstar for Shami in IPL 2022 'that' Performance; Said

प्रतिनिधी DNA मराठी टीम 

मुंबई –  २६ मार्च पासून आयपीएलचा पंधारावा हंगाम (IPL 2022) सुरु झाला आहे. या वेळी आयपीएलमध्ये आठ संघाऐवजी १० संघ सहभागी झाले आहे. गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) यावेळी स्पर्धेमध्ये प्रथमच सहभागी झाले आहे. या दोन्ही संघांदरम्यान सोमवारी वानखेडेवर पहिला सामना पार पडला आहे. यासामन्यात गुजरात टायटन्सने लखनऊ सुपर जायंट्सवर विजय मिळवला आहे. गुजरातसाठी या सामन्याचा हिरो ठरला तो म्हणजे मोहम्मद शमी (Mohammed Shami).

शमीने नवीन संघाकडून खेळताना पहिल्याच सामन्यात तीन महत्वाच्या विकेट्स घेतले आहे.  शमीने लखनऊचा कर्णधार के. एल. राहुलची पहिल्याच चेंडूवर विकेट काढली. त्यानंतर क्विंटन डी कॉक आणि मनीष पांडेचा अडथळाही शमीने दूर केला. त्याची ही भन्नाट कामगिरी पाहून हॉलिवूड तसेच अडल्ट फिल्म इंडस्ट्रीमधील पॉर्नस्टार किंद्रा लस्ट (Kindra Lust) ने ट्विटरवरुन त्याला टॅग करत एक ट्विट केला आहे.  यामध्ये तिने शमीचं अभिनंदन केलं आहे. विशेष म्हणजे किंद्रा ही क्रिकेटची चाहती आहे आणि ती क्रिकेट फॉलो करते हे अनेकांना ठाऊक नव्हतं. मात्र ती केवळ क्रिकेटची चाहतीच नाही तर मोहम्मद शमीचीही चाहती असल्याचं तिच्या ट्विटवरुन स्पष्ट झालंय.

“मोहम्मद शमीने अगदीच छान कामगिरी केलीय,” असं क्रिंद्राने ट्विट केलंय. यामध्ये तिने इमोन्जी सुद्धा वापरले असून शमीला टॅग केलं आहे. क्रिंदाचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. हा सामना गुजरातच्या संघाने पाच गडी राखून जिंकला. या विजयासहीत गुजरातने आपल्या नावावर दोन गुणांची नोंद केलीय.

Related Posts
1 of 2,480
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: