पॉर्न फिल्म प्रकरण , अभिनेत्री शर्लिन चोप्राला पोलिसांनी बजावले समन्स

0 62

नवी मुंबई –  पॉर्नोग्राफी प्रकरणात अटकेत असलेला अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) चा पती व्यावसायिक राज कुंद्रा(Raj Kundra) ला आपल्या सुटकेसाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. सध्या राजला  9 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडीत  मिळालेली आहे. राजच्या जमीन अर्जावर 7 ऑगस्ट रोजी मुंबई उच्च न्यायालयात तर 10 ऑगस्ट रोजी सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे.याच दरम्यान मुंबई पोलिसांच्या  प्रॉपर्टी सेलने  बॉलीवूड अभिनेत्री शर्लिन चोप्राला (Actress Sherlyn Chopra) चौकशीसाठी समन्स बजावले आहे. (Porn film case: Actress Sherlyn Chopra summoned by police)

पोलिसांनी शर्लिनला शुक्रवारी चौकशीसाठी बोलवले आहे.  पोलीस सातत्याने नवीन साक्षीदार आणि पीडितांची चौकशी करत आहेत. पण शर्लिनची साक्ष राज कुंद्रा च्या अडचणीमध्ये वाढ करू शकते. याचे कारण असे की, शर्लिन केवळ पॉर्न फिल्म प्रकरणी महत्त्वाची साक्षीदार नाही, तर तिने राज कुंद्रावर लैंगिक छळाचा आरोपही केला आहे.

हे पण पहा – सावधान ! दुकानात चोरी करणारी महिलांनी टोळी

न्यायालयाने पोलिसांकडून  मागितले उत्तर
19 जुलै रोजी राज कुंद्राला अटक करण्यात आली होती . त्याला प्रथम 27 जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली होती तर न्यायालयाने नंतर त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. सत्र न्यायालयाने जामीन अर्जावर सुनावणी साठी 10 ऑगस्टची तारीख निश्चित केली आहे. राज कुंद्रा यांच्यासह त्यांचे आयटी प्रमुख रायन थारप यांच्या जामीन अर्जावरही 10 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. जामीन अर्जावर न्यायालयाने मुंबई पोलिसांकडून उत्तर ही मागितले आहे. पोलिस पुन्हा एकदा जामिनाला विरोध करतील असे सांगितले जाते.

Related Posts
1 of 67

जमिन प्रकरण.. – पाच जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल…..

 

शर्लिन चोप्राने एप्रिलमध्ये  दाखल केली होती एफआयआर 

दुसरीकडे, शर्लिन चोप्राची साक्ष या संपूर्ण प्रकरणात महत्त्वाची ठरू शकते. राज कुंद्राच्या अटकेपूर्वीच शर्लिन चोप्रा हिनेही एप्रिल महिन्यात व्यावसायिकावर लैंगिक छळासंदर्भात एफआयआर दाखल केली आहे. शर्लिनने आरोप केला आहे की तिने राज कुंद्रासोबत एका व्यवसायाच्या कराराच्या संदर्भात चर्चा केली होती. पण फोनवर आलेल्या मेसेजमध्ये दोघांमध्ये वाद झाला. यानंतर राज कुंद्रा तिच्या घरी आला आणि तिला जबरदस्तीने किस केले. शर्लिनने राज कुंद्राला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण ती घाबरलीही. (Porn film case: Actress Sherlyn Chopra summoned by police)

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: