Porn apps प्रकरणात शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अटक

0

नवी मुंबई –   बॉलीवूड मधील चर्चीत अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Actress Shilpa Shetty) पती राज कुंद्राला(Raj Kundra) मुंबई पोलिसांनी काल रात्री अटक केली आहे. काही महिन्यापूर्वी अश्लील चित्रपटांची निर्मिती करून अॅप्सवर प्रदर्शित करण्याच्या आरोपावरून राज कुंद्राची मुंबई पोलिसांनी सात ते आठ तास चौकशी केल्यानंतर राजला काल रात्री अटक करण्यात आली असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.  याच बरोबर या प्रकरणात आता पर्यंत अकरा जणांना अटक करण्यात आल्याची देखील माहिती समोर आली आहे.  (Porn apps case – Shilpa Shetty’s husband Raj Kundra arrested)

मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी या प्रकरणात अधिक माहिती दिली आहे . पॉर्न फिल्म्सची निर्मिती करून या फिल्म्स काही मोबाईल अॅप्सवर प्रदर्शित केल्या जात असल्याचं प्रकरण काही महिन्यांपूर्वी पोलिसांनी उघडकीस आणलं होतं. याप्रकरणात पोलिसांनी एका अभिनेत्रीलाही अटक केली होती. या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात राज कुंद्राला अटक करण्यात आली आहे.

 

फेब्रुवारी महिन्यात पोलिसांनी कारवाई केली होती. पॉर्न अॅप्स प्रकरणी त्यावेळी गुन्हाही दाखल झाला होता. या प्रकरणात राज कुंद्रा मुख्य सूत्रधार असल्याचं दिसत आहे. यासंदर्भात त्याच्याविरुद्ध पोलिसांकडे पुरेसे पुरावे असल्याची माहिती पोलीस आयुक्त नगराळे यांनी दिली आहे. मुंबई पोलिसांच्या प्रॉपर्टी सेलनं कुंद्राला चौकशीसाठी बोलावलं होतं.

Related Posts
1 of 1,189

Project Pegasus प्रकरण- यामागे मोदी सरकार नाही तर मग कोण? सुब्रहमण्यम स्वामी

या प्रकरणात पोलिसांकडून चित्रपट बनवणाऱ्या अनेकांची चौकशी करण्यात आली होती. आज (१९ जुलै) कुंद्राला चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. सुमारे ७ ते ८ तास त्यांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी राज कुंद्राला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. कुंद्राला उद्या (२० जुलै) न्यायालयासमोर हजर केलं जाणार आहे. राज कुंद्राविरोधात पुरेसे पुरावे असल्यामुळे अटक करण्यात आली आहे.(Porn apps case – Shilpa Shetty’s husband Raj Kundra arrested)

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: