Porn apps प्रकरण – या व्हाट्सअप चॅटमुळे झाली राज कुंद्राला अटक

0

नवी मुंबई –  अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Actress Shilpa Shetty) चा पती राज कुंद्रा (Raj Kundra) ला सोमवार रात्री मुंबई पोलिसांनी अश्लील चित्रपटांची निर्मिती करून अॅप्सवर प्रदर्शित करण्याच्या आरोपावरून अटक केली आहे. या प्रकरणात आता पर्यंत मुंबई पोलिसांनी अकरा जणांना अटक केली आहे . मात्र यापैकी काही जमीनीवर बाहेर आहे. बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अटक करण्याअगोदर त्याच्याबरोबर जवळपास सात ते आठ तास चौकशी केल्याची देखील माहिती पोलिसांनी दिली आहे. (Porn apps case – Raj Kundra arrested for this WhatsApp chat )

मुंबई पोलिसांकडे राज कुंद्रा विरुद्ध सबळ पुरावे आहेत. ज्या व्हाट्सअप चॅटवरून (WhatsApp Chat) तो दोषी ठरू शकतो ते व्हाट्सअप चॅट पोलिसांच्या हाती लागले आहेत.

मिळालेल्या माहीत नुसार लंडनमधील जी कंपनी पोर्न व्हिडीओ तयार करते, आणि इंटरनेटवर अपलोड करते. त्याच्यासोबत राज कुंद्राचे व्हाट्सअप चॅट पोलिसांच्या हाती लागले आहेत. यामुळेचं राज कुंद्राला अटक झाली आहे. एका प्रदीप बक्षी नावाच्या व्यक्तीशी राजने व्हाट्सअप चॅट केले आहेत. यामध्ये राज आणि प्रदीप यांच्यात अश्लील चित्रफितसंबंधी बोलणं झालं होतं. तसेच या अश्लील चित्रफितमध्ये होणाऱ्या नफ्यावरसुद्धा व्हाट्सअप चॅट करण्यात आलं होतं.इतकचं नव्हे तर दररोज सोशल मीडियावर मिळणाऱ्या लाईक्स, कमेंट्स आणि सबस्क्रायबरबद्दलही यामध्ये बोलण्यात आलं होतं. धक्कादायक म्हणजे या अश्लील व्हिडीओमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रींनी किती रक्कम घेतली यावरही व्हाट्सअप चॅटमध्ये बोलण्यात आलं होतं.

Porn apps प्रकरणात शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अटक

हे सर्व व्हाट्सअप चॅट एका H अकाऊंट नावाच्या ग्रुपवर करण्यात आले होते. या ग्रुपमध्ये 5 लोकांचा समावेश आहे. प्रदीप बक्षी, राज कुंद्रा, मेघा, रोब डिजिटल मार्केटिंग हॉटशाटस आणि रॉय इव्ह्न्स कन्टेन्ट हेड हॉटशाटस अशी या सदस्यांची नावे आहेत.तसेच उमेश कामथ नावाच्या एका व्यक्तीचासुद्धा यामध्ये समावेश आहे. जी केनरीन या कंपनीची भारतातील प्रतिनिधी असून, ही कंपनी पोर्न फिल्मसाठी एजेंट आणि गुंतवणूक शोधायचे.(Porn apps case – Raj Kundra arrested for this WhatsApp chat )

Porn apps प्रकरण –  राज कुंद्रानंतर आणखी एकाला अटक….. 

Related Posts
1 of 1,189
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: