Porn apps प्रकरण –  राज कुंद्रानंतर आणखी एकाला अटक….. 

0

नवी मुंबई –   फेब्रुवारी महिन्यात उघडीस आलेला पॉर्न चित्रपट निर्मिती प्रकरणात मुंबई पोलिसांनी कारवाई करत बॉलीवूडची चर्चित अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Actress Shilpa Shetty) चा पती राज कुंद्रा (Raj Kundra) ला अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी राजची जवळपास सात ते आठ तास चौकीसी केल्यानंतर सोमवार रात्री १०च्या सुमारास त्याला अटक केली आहे.  (Porn apps case – Another arrested after Raj Kundra …..)

आता या प्रकरणात मुंबई पोलिसांनी कारवाई करत राज कुंद्रा नंतर आणखी एकाला अटक केली आहे.  नवी मुंबईतील नेरूळमधून त्याला अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अश्लील चित्रपटांची निर्मिती करणे आणि ते प्रदर्शित करण्याच्या आरोपाखाली राज कुंद्रासह आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत ११ जणांना अटक करण्यात आलेली आहे.

पॉर्न फिल्म्स निर्मिती रॅकेट प्रकरणात पोलिसांनी सोमवारी शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला अटक केली. मुंबई पोलिसांच्या प्रॉपर्टी सेलने राज कुंद्राला चौकशीसाठी बोलावलं होतं. सात ते आठ तास चौकशी केल्यानंतर पोलिसांनी अटकेची कारवाई केली. पॉर्न फिल्म्स निर्मितीत राज कुंद्रा मुख्य सुत्रधार असल्याचं पोलिसांनी आतापर्यंत हाती आलेल्या पुराव्यांच्या आधारे म्हटलं होतं. राज कुंद्राला अटक करण्यात आल्यानंतर पोलिसांनी आणखी एकाला अटक केली. रायन जॉन थार्प (Ryan John Tharp) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे.

Porn apps प्रकरणात शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अटक

काय आहे प्रकरण?

Related Posts
1 of 1,189

फेब्रुवारी महिन्यात मुंबई पोलिसांच्या एका पथकाने मढ येथील ग्रीन पार्क बंगलोवर धाड टाकली होती. याठिकाणी पॉर्नोग्राफिक शुटिंग होत असल्याच्या माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी पोलिसांनी पाच जणांना अटक केली होती. तर एका मुलीची सुटका केली होती. अटक करण्यात आलेल्या पाच जणांमध्ये दोन अभिनेत्यांचा, तर दोन तरुणींचा समावेश आहे. या दोन्ही तरुणी अभिनयाच्या क्षेत्रात नशिब आजमावण्यासाठी आल्या होत्या. मात्र, त्या पॉर्नोग्राफिक व्हिडीओ तयार करणाऱ्या प्रोडक्शन हाऊसच्या जाळ्यात अडकल्या. ही मोठी कारवाई केल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. (Porn apps case – Another arrested after Raj Kundra …..)

Project Pegasus प्रकरण- यामागे मोदी सरकार नाही तर मग कोण? सुब्रहमण्यम स्वामी

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: