पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण “तो” संभाषण संजय राठोड यांचा?, पोलीस करणार तपास

0 28

पुणे –  २२ वर्षीय पूजा चव्हाण (Pooja Chavan) या तरुणीने पुणेमध्ये एका इमारतीवरून उडी मारून ०७ फेब्रुवारी रोजी आत्महत्या केली होती. या आत्महत्यानंतर शिवसेनेचे यवतमाळमधील आमदार आणि राज्याचे माजी वनमंत्री संजय राठोड (Sanjay rathod) चर्चेत आले होते. त्यांना या प्रकरणावरून आपल्या मंत्री पदाचा राजीनामा देखील द्यवा लागला होता. मात्र आता परत त्यांच्या या प्रकारावरून अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. (Pooja Chavan suicide case “he” conversation Sanjay rathod ?, police will investigate)

पूजा चव्हाणच्या आत्महत्येच्या पाच दिवस आधी पूजा चव्हाण आणि माजी मंत्री संजय राठोड यांच्यात अनेकदा फोनवरुन संभाषण झालं होतं. या सर्व संभाषणांचं रेकॉर्डिंग पोलिसांच्या हाती लागलं आहे अशी माहिती इंडियन एक्स्प्रेसने दिली आहे. त्या वृत्तानुसार पूजाच्या मोबाइलमध्ये सापडलेल्या या संभाषणांमधील एक संभाषण ९० मिनिटं चाललं होतं अशी सूत्रांची माहिती आहे.

प्राथमिकदृष्ट्या फोनमधील संभाषणावरुन समोरील व्यक्ती संजय राठोडच असल्याचं दिसत आहे. तिने आपली सर्व संभाषणं रेकॉर्ड केली होती. हे संभाषण बंजारा भाषेत झालं असल्याने आम्ही भाषांतर करुन घेत आहोत,अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. संजय राठोड आणि पूजा चव्हाण दोघेही एकाच आदिवासी बंजारा समाजातून होते. मूळची बीडची असणारी पूजा शिक्षणासाठी पुण्यात राहत होती. आत्महत्येनंतर तिच्यात आणि संजय राठोड यांच्यात संबंध असल्याचा आरोप झाला.

१६ कोटी रुपयांचा इंजेक्शन देऊनही ,वेदिका शिंदेचा उपचारादरम्यान मृत्यू

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजाचा मोबाइल फोन ज्यामध्ये सर्व संभाषणांचं रेकॉर्डिंग आहे तो फॉरेन्सिकसाठी पाठवण्यात आला आहे. पोलीस मोबाइलमधील सर्व डेटा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. तसंच आत्महत्येच्या २४ तास आधीचं यवतमाळ मेडिकल कॉलेज हॉस्पिटलच्या आवारातील सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांना मिळवलं असून फॉरेन्सिकसाठी पाठवलं आहे. फुटेजमध्ये पूजा राठोड ही संजय राठोड यांचा निकटवर्तीय अरुण राठोडसोबत दिसत आहे. अरुण आणि संजय राठोड यांचा अजून एक सहकारी विलास चव्हाण हे पूजासोबत पुण्यातील मोहम्मद वाडी येथील हेवन पार्कमध्ये एका भाड्याच्या घऱात राहत होते. तिथेच तिचा मृत्यू झाला.

पोलिसांना यवतमाळ मेडिकल कॉलेमजधून पूजाच्या फोन आणि सीसीटीव्ही फुटेजचा रिपोर्ट मिळाला आहे. मात्र अद्याप पोलिसांनी संजय राठोड यांच्या आवाजाचे सॅम्पल लॅबकडून मागवलेले नाहीत.  (Pooja Chavan suicide case “he” conversation Sanjay rathod ?, police will investigate)

हे पण पहा – दरड कोसळून १५ जणांचा मूत्यू फडणवीस यांनी कुटुंबियांचे सांत्वन 

Related Posts
1 of 1,332
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: