DNA मराठी

वॉरंट मध्ये पकडून आणलेल्या आरोपीसोबत पोलिसांची जंगी पार्टी; मात्र अधिकाऱ्यांची हाताची घडी अन् तोंडावर बोट

0 742
Police war party with accused arrested in warrant; But the wrist of the officer is on the end

 

श्रीगोंदा :-  श्रीगोंदा पोलीस (Shrigonda Police) ठाण्यातील पोलीस हेडकॉन्स्टेबल यांचेवर वॉरंट बजावणीचे काम आहे त्या पोलिसाने वॉरंट बजावणी करताना एका आरोपीला ताब्यात घेतले आणि बंगल्यावर नेऊन जंगी पार्टी केली मग पहाटे पोलीस अधिकारी यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी विचारणा करताच नशा उतरून आरोपीला बेड्या ठोकल्याचा धक्कादायक प्रकार श्रीगोंदा पोलीस ठाण्यात घडला असून याबाबत सर्वच वरिष्ठ अधिकारी मात्र मौन बाळगताना दिसत आहेत.

सर्वात शिस्तप्रिय खाते म्हणून पोलीस खात्याची ओळख असली तरीही हे शब्द श्रीगोंदा पोलिसांना लागू होत नाहीत असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही असाच एक प्रकार श्रीगोंदा पोलीस ठाण्यात घडला आहे.  श्रीगोंदा न्यायालयाचे समन्स वॉरंट बजावणीसाठी पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी पोलीस हेडकॉन्स्टेबल मुकेशकुमार बडे यांची नेमणूक केली आहे. या महाशयांनी काही दिवसांपूर्वी वॉरंट मध्ये एका आरोपीस अटक केली मात्र मित्रप्रेम जास्त असल्यामुळे सायंकाळच्या सुमारास आजारपणाच्या नावाखाली दप्तरी दवाखान्यात उपचारासाठी दाखल अशी नोंद करून त्या आरोपीला भाड्याने घेतलेल्या स्वतःच्या बंगल्यावर नेले त्या ठिकाणी आरोपी सोबत मासे मटण तसेच मोठ्या प्रमाणात सोमरस प्राशन करत जंगी पार्टी करण्यात आली.
 पार्टी झाल्यावर त्या ठिकाणी नशेच्या धुंदीत झोपी गेले आणि त्याच दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जाणकर यांनी नेहमीप्रमाणे दुय्यम कारागृह तपासले असता त्यांना एक आरोपी कमी आढळून आला याबाबत त्यांनी दप्तर तपासले असता दप्तरी उपचारासाठी दाखल अशी नोंद करण्यात आली होती मात्र ड्युटी तक्त्यावर दवाखान्यात कोणाचीही नेमणूक करण्यात आलेली नसल्याने महेश जानकर यांनी श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात चौकशी केली असता त्या ठिकाणी कोणताही आरोपी उपचारासाठी दाखल नसल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यांनी तात्काळ पोलीस हेडकॉन्स्टेबल मुकेशकुमार बडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मोबाईल वरून आरोपी सोबत असल्याची माहिती दिली त्यांनी तात्काळ सांगितले की आरोपी तात्काळ जमा करा मग अक्षरशः बडे यांची नश्या उतरली आणि त्यांनी तो आरोपी पोलीस ठाण्यात जमा केला ही बाब वाऱ्यासारखी शहरभर पसरली मग पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी मुकेशकुमार बडे यांचा चांगलाच खरपूस समाचार घेतला मात्र या प्रकरणाची कोणालाही माहिती मिळू नये यासाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात खबरदारी घेतली आहे मात्र तरीही हे प्रकरण लोकांना समजलेच अशी खुलेआम चर्चा होताना दिसत आहे त्यामुळे या मित्रप्रेम पाळणाऱ्या पोलिसांवर आता नेमकी कोणती कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
अधिकाऱ्यांची हाताची घडी आणि तोंडावर बोट !
या प्रकरणात काही पोलीस अधिकारी यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी त्यांना विचारणा केली असता त्यांनी याबाबत काहीच माहिती नाही असे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला तर काहींनी हाताची घडी आणि तोंडावर बोट अशी भूमिका घेतल्याने मोठ्या प्रमाणात चर्चेला उधाण आले होते.
Related Posts
1 of 2,452
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: