जातेगाव येथे अफूची शेती ,५६ किलो अफूचे झाडे पोलीसांनी केले जप्त

0 13

जामखेड – तालुक्यातील जातेगाव येथे एका शेतकऱ्याने शेतात अफूची लागवड केली असून ती मोठी झाली आहे अशी गुप्त माहिती पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना मिळाली त्यावरून त्यांनी पथकासह छापा टाकला असता १ लाख ७० हजार रुपयांची ५६ किलो वजनाची अफूची झाडे पोलीसांनी जप्त केले व आरोपी विरूद्ध अमली औषधे द्रव्य व मन प्रभावी पदार्थ अधिनियम सन १९८५ चे कलम १५ क प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.

येत्या दोन दिवसांत संजय राठोड देणार आपल्या पदाचा राजीनामा ?

याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, गुरुवार दि.२५ रोजी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना गुप्त बातमी दाराकडुन माहिती मिळाली की तालुक्यातील जातेगाव येथे आरोपीचे वासुदेव महादेव काळे वय ३९ रा. जातेगाव याने स्वतःचे मालकीचे गट नंबर १०७७ मध्ये अफूची लागवड केली आहे. या माहितीवरून तहसीलदार विशाल नाईकवाडे, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, सहायक फौजदार विठ्ठल गायकवाड, संजय लाटे, संदीप आजबे, संग्राम जाधव, विजयकुमार कोळी, अविनाश ढेरे, आबासाहेब आवारे, संदीप राऊत, सचिन पिरगळ, हनुमान आरसुळ यांचे पथक जातेगाव येथे गुरुवरी रात्री आठ वाजता दाखल झाले.

श्रीगोंदा पोलिसांचा अजब खुलासा आम्ही जास्त घेतो तुम्ही कमी छापले आहेत ?

Related Posts
1 of 1,290

सदर पथकाने आरोपी वासुदेव काळे यांच्या शेतात छापा टाकला असता त्यामध्ये १ लाख ६९ हजार ८१५ रुपये किंमतीची ५६ किलो ग्रॅम वजनाचे अफूचे झाडे आढळून आली. पोलिसांनी त्याचा पंचनामा करून आरोपीला अटक केली. याबाबत जामखेड पोलीसात संजय लाटे यांनी फिर्याद दिली आहे.

छोट्या छोट्या गोष्टींवर बोलणारे गृहमंत्री कुठे आहेत – देवेन्द्र फडणवीस

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: