पोलिसांकडून 33 पोते गुटखा जप्त, गुटख्याची किंमत लाखोंमध्ये

0 330

 नवी मुंबई –   मुंबई – नाशिक (Mumbai – Nashik) महामार्गावर असणारा कसारा घाट (Kasara Ghat) परिसरातील घाटनदेवी मंदिर शिवारात ३३ पोते गुटखा (gutkha) पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे.  ही कारवाई घोटी केंद्र पोलिसांनी केली असून या कारवाईत पोलिसांनी 25 ते 30 लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. गुप्त बातमीदार मार्फत मिळालेल्या माहितीवरून महामार्ग घोटी केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे यांनी त्यांच्या पथकासह ही कारवाई केली आहे. (Police seize 33 bags of gutkha, valued at millions)

या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार  महामार्ग घोटी केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे (Amol Walzade) यांना दूरध्वनीवरून लाखो रुपयांचा गुटखा बेवारस स्थितीत पडल्याचे खबऱ्याने सांगितले होते. त्यानंतर वालझाडे यांनी तातडीने आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेत समक्ष पाहणी करून दिलेली खबर पक्की असल्याची खात्री केली आणि इगतपुरी पोलीस ठाण्याला कळविले.

पांढऱ्या रंगाच्या 33 पोत्यामध्ये हा गुटखा होता. महामार्ग पोलीस पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, पोलीस हवालदार संतोष गांगुर्डे, जितेंद्र पाटोळे, राम वारुंगसे, जगदीश जाधव आणि इगतपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वसंत पथवे यांनी संपूर्ण गुटखा ताब्यात घेत अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून मोजमाप झाल्यावर या गुटख्याची किंमत वाढू शकते, असा अंदाज आहे.

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट ‘या’ महिन्यात करणार लग्न?

Related Posts
1 of 1,608

दरम्यान, दुर्गम माळरानावर संबंधित गुटख्याची उलाढाल व ने-आण कोण करीत आहे, याबाबत इगतपुरी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. महामार्ग पोलिसांनी सराईत गुन्हेगारी वृत्तीच्या इसमाच्या मुसक्या आवळून त्यांना जेरबंद करण्याची मोहीम सुरू केली आहे.(Police seize 33 bags of gutkha, valued at millions)

हे पण पहा –  फर्निचरच्या गोडाऊनला भीषण आग, पहा हा भीषण आगीचा व्हिडिओ

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: