जिल्ह्यात पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा ; पाच आरोपींना अटक

प्रतिनिधी DNA मराठी टीम
अहमदनगर – पाथर्डी पोलिसांनी (Pathardi police) मोठी कारवाई करत जुगार अड्ड्यावर छापा टाकला आहे. या कारवाईत पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. संजय रघुनाथ दिनकर ,(वय 50 वर्षे), सुभाष जगन्नाथ दिनकर (वय 51 वर्षे), शेख मुनीर गुलाबभाई (वय 55 वर्षे), सुनिल काशिनाथ दिनकर (वय 35 वर्षे) आणि बाबा विनायक दिनकर (वय 30 वर्षे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे. (Police raids gambling dens in the district; Five accused arrested)