पोलीस अंमलदाराचा तरुणीवर अत्याचार; MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

प्रतिनिधी DNA टीम
अहमदनगर – अहमदनगर शहरात (Ahmednagar City) मागच्या काही दिवसांपासून महिलांवर होणाऱ्या आत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. दोन दिवसापूर्वीच तोफखाना पोलीस ठाण्यात एका तरुणीने गुन्हा दाखल केला होता तर आत शहरातील एमआयडीसी पोलीस (MIDC Police) ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस अंमलदारा विरुद्ध अत्याचार केल्याचा गुन्हा एका तरुणीने दाखल केल्याने एकच खळबळ उडाली आहे. कल्याण ईस्ट, ठाणे येथे राहणाऱ्या तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून याप्रकरणी त्याच्यासह नातेवाईकांविरूध्द अत्याचार, फसवणूक आदी कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस अंमलदार किरण कोळपे, आशाबाई कोळपे, तिचा भाऊ सिताराम, त्यांचा एक नातेवाईक उत्तम, आशाबाईच्या मामाचा मुलगा भारत (पूर्ण नाव माहिती नाही, रा. विळद ता. नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.