पोलिस अधिकार्‍याकडून २५ वर्षीय तरुणीवर बलात्कार, गुन्हा दाखल

0 676

पुणे –   राज्यात मागच्या काही दिवसांपासून महिलांवर अत्याचाराच्या तसेच बलात्काराच्या (Rape) घटनेत वाढ पहिला मिळत आहे.राजधानी मुंबईत साकीनाका (Sakinaka) परिसरात ३० वर्षीय महिलेवर मागच्या काही दिवसापूर्वी बलात्काराची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच आता पुणे शहरात एका पोलीस  उपनिरीक्षकावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यातील वाहतूक शाखेतील पोलीस उपनिरीक्षकाने एका २५ वर्षीय तरुणीवर बलात्कार (Rape of a young woman) केल्याची घटना समोर आली आहे . या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रविण नागेश जर्दे (Pravin Nagesh Zarde) असं या आरोपी अधिकाऱ्यांचं नाव आहे.

या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार आरोपी प्रविण जर्दे हा कोथरुड पोलीस स्टेशनमध्ये मे २०१८ मध्ये नेमणुकीला होते. त्यावेळी पीडित तरुणी एका तक्रार देण्यासाठी पोलिस चौकीत आली होती. तेव्हा आरोपी प्रविण पोलिस चौकीत कार्यरत होते. तिथून त्यांची ओळख झाली. त्या ओळखीचं रूपांतर मैत्रीत आणि त्यानंतर प्रेमात झालं. त्या तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून त्याने तिच्यासोबत शारिरीक संबंध ठेवले. मात्र, जेव्हा त्या तरुणीने आरोपीकडे लग्नाबाबत विचारणा केली तेव्हा त्याने लग्नास नकार देत उलट तिला धमक्या (Threats) दिल्या.

फिल्म इंडस्ट्रीमधील आणखी एका लोकप्रिय अभिनेत्रीची आत्महत्या

मी पोलीस अधिकारी आहे. तुझे तुकडे तुकडे करुन तुला संपवून टाकीन. कोणीही माझं काही वाकडं करु शकत नाही. मी सर्व मॅनेज करेन अशी धमकी देत तिला मारहाण देखील केली. त्यानंतर पीडित तरुणीने घडलेला सर्व प्रकार सांगताच आरोपी प्रविण जर्दे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांनी सुरु केला आहे.

हे पण पहा  – Praniti Shinde | काँग्रेस आमदार प्रणिती शिंदें यांच्यावर गुन्हा दाखल

Related Posts
1 of 1,608
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: