गुन्हा करण्याच्या उद्देशाने हत्यार घेऊन फिरणारा पोलिसांनी पकडला

0 147

  श्रीगोंदा –  श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडेवळीत या ठिकाणी दि 8 सप्टेंबर रोजी  पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांना गुप्त बतमीदाराकडून माहिती मिळाली की रेकॉर्ड वरील गुन्हेगार संतोष हौसराव गोयकर रा . गोयकरवाडी , ता . कर्जत जि . अहमदनगर हा टाकळी कडेवळीत गावात बस स्टॅन्डवर हातात सत्तुर घेवुन काहीतरी गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरत आहे अशी माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी  स.पो.नि. दिलीप तेजनकर , स.फौ.अकुंश ढवळे , पो.का किरण बोराडे , पो.का. गाडे असे पोलीस स्टेशन येथे हजर असताना , मा . पो.नि. रामराव ढिकले यांनी कॅबीन मध्ये बोलावुन कळविले की , रेकर्डवरील मालाविरुध्दचे गुन्हेगार शोध कामी हद्दीत पेट्रोलींग करा असे सांगीतल्याने आम्ही श्रीगोंदा पोलीस स्टेशन नोंद क्र . 32 वेळ 19/57 वा . प्रमाणे श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथुन रवाना होवुन टाकळी कडेवळीत गावात गेलो .

पो.नि.रामराव ढिकले सो यांनी स . पो.नि.तेजकर साहेब यांना फोन करुन सांगीतले की , आत्ताच गुप्त बातमी दारामार्फत बातमी मिळाली की , संतोष हौसराव गोयकर रा . गोयकरवाडी , ता . कर्जत जि . अहमदनगर हा टाकळी कडेवळीत गावात बस स्टॅन्डवर हातात सत्तुर घेवुन काहीतरी गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरत आहे . अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने त्याच्यावर कारवाई करण्याचा आदेश दिल्याने स.पो.नि.तेजनकर योनी लागलीच दोन पंचाना टाकळी कडेवळीत गावात बोलावुन घेवुन न बातमीतील हकीगत समजावुन सांगीतली व कारवाई कामी पंच म्हणुन सोबत येण्याची विनंती केली तेव्हा पंच छापे कारवाई करीता पंच म्हणुन येण्यास स्वखुशीने सहमत झाले .
 त्यानंतर आम्ही वरील पोलीस पथक व पंच असे टाकळीकडेवळीत गावाचे बसस्थानकासमोर जावुन खात्री केली असता , एक इसम त्याचे हातात सत्तुर घेवुन जात असताना दिसला पोलीस व पंचाची खात्री होताच आम्ही पोलीसांनी 9 चे सुमारास छापा टाकुन सदर इसमास जागीच पकडुन त्यास त्याचे नाव गाव विचारले असता , त्याने त्याचे नाव संतोष हौसराव गोयकर वय 32 वर्षे , रा . गोयकरवाडी , ता . कर्जत जि . अहमदनगर असे असल्याचे सांगीतले त्याची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता , त्याचे कब्जात एक लोखंडी सत्तुर मिळुन आला त्याचे वर्णन खालीलप्रमाणे 500 / – रु किमतीचा एक लोखंडी धारदार पाते असलेला सत्तुर त्याचे पात्याचे लांबी 23.5 से.मी. टोकास निमुळते असलेला , रुदी 7.5 से.मी. मध्यभागी 12 से.मी. लांबीची मुठ असलेला जु.वा. कि.अं. मोजमाप अंदाजे …. –500 / – रुपये एकुणवरील प्रमाणे लोखडी सत्तुर आरोपी नामे संतोष हौसराव गोयकर , वय 32 वर्षे , रा . गोयकरवाडा , ता . कर्जत जि . अहमदनगर याचे कब्जात मिळुन आल्याने त्याचा स.पो.नि. तेजनकर सो यानी पंचासमक्ष पंचनामा करुन त्यावर पंचाचे व त्यांचे सह्याचे कागदी लेबल लावुन तो गुन्ह्याचे तपासकामी जप्त केला आहे .
Related Posts
1 of 1,481
तसेच आरोपीस घेवुन पोलीस ठाणेस आलो आहेत.तरी दिनांक 28 सप्टेंबर रोजी 9चे . सुमारास टाकळी कडेवलीत बसस्टँडवर इसम नामे संतोष हौसराव गोयकर , वय 32 वर्षे , रा . गोयकवाडी ता . कर्जत जि . अहमदनगर हा हातात सत्तुर बाळगताना मिळुन आला म्हणुन माझी त्याचे विरुध्द भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 प्रमाणे फिर्याद दाखल करण्यात आली असून या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर हे करत आहे .
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: