पोलिसांकडून अनैतिक देहव्यापाराचा व्यवसाय चालविणाऱ्या दोन जणांना अटक करून १३ महिलांची सुटका

0 9

नाशिक –  नाशिकच्या इंदिरानगर परिसरात नाशिक पोलिसांकडून मोठी कारवाई करत अनैतिक देहव्यापाराचा व्यवसाय चालविणाऱ्या दोन व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी ही कारवाई करत त्या ठिकाणी असलेल्या १३ पिडीत महिलांची सुटका नाशिक गुन्हे शाखेच्या वतीने करण्यात आली आहे.

या प्रकरणाबद्दल मिळालेल्या अधिक माहिती अशी की दि. २७ फेब्रुवारी रोजी पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले यांना प्रभुदेवा अपार्टमेन्ट , विनयनगर नाशिक येथे फिलोमिना शर्मा व अर्जुन सिंग चौहान या नावाचे इसम सदर अपार्टमेंट तसेच अपार्टमेंटला लागुन असलेल्या इमारतीमध्ये स्वत : च्या आर्थिक फायदयाकरीता दुसऱ्या राज्यातुन मुलींना आणि महिलांना पैशांचे आमिष देवुन आणुन जबरदस्तीने देहव्यापार करण्यास प्रवृत्त करीत आहेत अशी गोपनिय बातमी मिळाली. या बातमीवरून पौर्णिमा चौगुले यांनी कायदेशिर कारवाई करण्याचे आदेश अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष मध्यवर्ती गुन्हेशाखा नाशिक शहर सहायक पोलिस निरीक्षक सावंत यांना दिले.

त्याप्रमाणे मध्यवर्ती गुन्हेशाखेकडील अधिकारी अंमलदार तसेच मुख्यालय व नियंत्रण कक्षाकडील अधिकचे अधिकारी व अंमलदार यांचे सहाय्याने बोगस ग्राहक पाठवून मिळुन आलेल्या माहितीनुसार प्रभुदेवा अपार्टमेंन्ट , विनयनगर नाशिक या ठिकाणी अनैतिक देहव्यापार होत असल्याची खात्री करुन सापळा लावून छापा कारवाई केली.

सदर ठिकाणी फिलोमिना शर्मा व अर्जुन सिंग चौहान या इसमाने परराज्यातुन विशेषतः पश्चिम बंगाल व बिहार या ठिकाणाहुन अनैतिक देहव्यापाराच्या व्यवसायाकरिता आणलेल्या एकुण १३ महिला, मुली या ठिकाणी मिळुन आल्या. छापा कारवाई दरम्यान सदर मुलीं, महिलांसोबत अनैतिक समागमाकरिता आलेल्या एकुण ६ इसम ग्राहक यांना देखिल ताब्यात घेण्यात आले.

Related Posts
1 of 1,290

सदर कारवाईच्या अनुषंगाने मुंबईनाका पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हा रजि.नं ५४/२०२१ भादवि ३७०,३४ सह अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा कलम ३,४.५ अन्वये महिला नामे फिलोमिना शर्मा व इसम अर्जुनसिंग चौहान तसेच मिळुन आलेले ६ ग्राहक यांचे विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला असुन अटक आरोपी यांना दि.०३ मार्च पर्यंत पोलीस कस्टडी मिळाली असुन देहव्यापाराच्या अनैतिक व्यवसायाबाबत अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक सचिन सावंत मध्यवर्ती गुन्हेशाखा हे करित आहेत.

देह व्यापाराचा व्यवसाय चालविणारी महिला फिलोमिना शर्मा हिचे विरुध्द यापुर्वी देखिल २ वेळा अनैतिक देहव्यापाराचा व्यवसाय चालविल्याबद्दल गुन्हे नोंद आहेत.छापा कारवाईत मिळुन आलेल्या १३ पिडीत महिलांना सुरक्षिततेच्या कारणास्तव महिला वात्सल्य गृह , नाशिक या ठिकाणी ठेवण्यात आले आहे . सदरची कामगिरी पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय, पोलीस उपआयुक्त पौर्णिमा चौगुले, सहा.पोलीस आयुक्त सोहेल शेख यांचे मार्गदर्शनाा खाली प्रभारी पोलीस निरीक्षक डॉ.धर्मराज बांगर , सहायक पोलिस निरीक्षक सचिन सावंत , सहायक पोलिस निरीक्षक माधवी वाघ यांच्यासह टीमने संयुक्त रित्या केली आहे .

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: