राष्ट्रीय महामार्गावरुन दरोडा घालुन कंटेनर नेणारा आरोपीला ४ तासाचे आत पोलीसांनी केली अटक 

0 13

अहमदनगर –  राष्ट्रीय महामार्गावरुन दरोडा घालुन कंटेनर नेणारा आरोपीला ४ तासाचे आत पोलीसांनी ९० लाख २ हजार ५०० रुपयाचा मुददेमालासह ताब्यात घेतला आहे . पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचा नाव अकलाख असिम ऊर्फ अकलाक असिफ शेख अशा तर या प्रकरणातील चार आरोपी अद्याप फरार आहे .

या प्रकरणाची पोलिसांकडून  मिळालेली माहिती अशी कि दिनांक ०५ मार्च २०२१ रोजी दुपारी ०४.०० वा. चे सुमारास हिदायत हनिफ खान वय- २९ धंदा ड्रायवर रा.घर नं.६२ छरोरा तहसिल ताऊर जि.मेवात राज्य हरीयाना हा त्याचा कंटेनर नं.एच.आर ३८ डब्ल्यु ८१२० या मध्ये मारुती सुझुकी कंपनीच्या सात नविन गाडया त्यात सेलेरीया, वॅगनर, स्वीप्ट डिझायर अशा एकुण ०७ गाडया या दिल्ली वरुन गोवा येथे घेऊन जात असतांना संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा टोलनाक्याजवळ चहा पिण्यासाठी थांबला त्यावेळी कंटेनरची हवा चेक करता असतांना त्याचे पाठीमागुन एक काळे रंगाच्या बुलेट मोटार सायकलवर आलेल्या इसमांने फिर्यादीस शिवगाळ करुन मारहाण करुन त्याचे जवळील कटरचा धाक दाखवुन त्याचे इतर ४ साथीदारांना बोलावून घेऊन फिर्यादीचा कंटेनर दरोडा घालुन पळवून नेला व कंटेनर मधील फिर्यादीचे पाकिटातील रोख रक्कम २५००/- रुपये व त्याचे एच.डी एफ सी बँकेचे ए.टी एम कार्ड हे चोरुन नेले वगैरे मा ची माहिती १०० नंबरवर मिळाल्यांने तक्रारदार यांचा कंटेनरचा  वर्णन केलेल्या आरोपीचा हिवरगाव पावसा, संगमनेर परीसरात शोध घेता तो मिळुन आल्यांने त्यास गुन्हयाचे कामी कंटेनर क्रं. एच.आर ३८ डब्ल्यु ८१२० व त्यातील सात नविन चारचाकी वाहनांसाह ताब्यात घेतले.

जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. उदय शेळके यांची निवड 

त्याचेकडुन रोख रक्कम २५००/- रुपये फिर्यादी यांचे एच.डी एफ.सी कार्ड, सॅमसंग कंपनीचा मोबाईल फोन ,तसेच गुन्हयात वापरलेल हिरव्या रंगाचे कटर असा ९०,०२,५०० रु किं.चा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपीस तक्रारदार यांनी दिलेल्या माहिती नंतर ४ तासात मुददेमालासह ताब्यात घेण्यात आलेले आहे. त्यावरुन संगमनेर तालुका पोलीस स्टेशनला गु.र.नं.१०४/२०२१ भा.द.वि.क.३९५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर आरोपी नामे अकलाख असिम ऊर्फ अकलाक असिफ शेख रा. खलीलपुरा (कागदीपुरा) ता. जुन्नर जि.पुणे ह.रा. कुरण, ता.संगमनेर यास गुन्हयात अटक करण्यात आली आहे. यापुर्वी सदर आरोपी यावर जुन्नर पोलीस स्टेशन । गुर.नं.१६०/२०१६ भा.द.वि.क.३२६,३२३,५०४ प्रमाणे गुन्हा दाखल असुन सदर आरोपीवर इतर ठिकाणी गुन्हे दाखल आहेत काय? याबाबत पुढील तजवीज करीत आहोत. गुन्हयातील इतर फरार ४ आरोपीतांचा शोध चालु आहे.

Related Posts
1 of 1,290

महिलेला बंदुकीचा धाक दाखवून लैंगिक शोषण करणाऱ्या पोलिसावर गुन्हा दाखल

सदरची धाडसी व तत्पर कामगिरी पोलीस अधीक्षक मा. श्री. मनोज पाटील साो., मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर श्रीमती. दिपाली. काळे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी संगमनेर मा. श्री. राहुल मदने, यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. पांडुरंग पवार संगमनेर तालुका पो.स्टे तसेच संगमनेर तालुका पोलीस स्टेशनचे स.फो ईस्माईल शेख पो.ना/ बाबा खेडकर, पो.ना राजेंद्र घोलप, पो.ना यमना जाधव, चालक पो.ना ओंकार
शेंगाळ, पो.ना शिवाजी डमाळे, पो.ना दत्तात्रय मेंगाळ, पोशि अशोक गायकवाड, होमगार्ड नित्यानंद बापु गिरीगोसावी , अमोल दत्तु बुरकुल यांनी केली आहे.सदर गुन्ह्याचा पुढील तपास पो.नि श्री पांडुरंग पवार यांचे मार्गदर्शनाखील स.फो आय.ए.शेख हे करीत आहेत.

कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता औरंगाबादेत सोमवारपासून लॉकडाऊन ?

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: