दरोड्याच्या तयारीत असलेले ४ जण पोलिसांच्या ताब्यात… मुद्देमालही जप्त..

0 232

श्रीगोंदा :- श्रीगोंदा (Shrigonda) तालुक्यातील घुगल वडगाव परिसरातील महामानव बाबा आमटे बहुउद्देशीय सामाजिक विकास सेवा संस्थेच्या गेट समोरील रस्त्यावर दिनांक १ ऑक्टोबर रोजी रात्री २:३० वाजण्याच्या सुमारास औरंगाबाद जिल्ह्यातील व नेवासा तालुक्यातील साधारण आठ इसमांनी एकत्र जमून, दरोडा टाकण्यासाठी लागणारे कटावणी, नायलॉन दोरी, मिरचीपूड, धारदार सुरा व चार चाकी वाहन यासारखे साहित्य, साधन घेऊन दरोडयाच्या (Robbery) तयारीत असतांना व त्यांच्याकडील विनापरवाना बेकायदा धारदार हत्यारं मिळून आल्याने, पोलिसांनी कारवाई करत त्यांच्यावर भादवि कलम ३९९, ४०२ सह भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर माहिती अशी की, पोकॉ किरण बोराडे यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार घुगल वडगाव परिसरातील महामानव बाबा आमटे संस्थेच्या गेट समोर असलेल्या रस्त्यावर टाटा कंपनीचा छोटा हत्ती घेऊन, परमेश्वर उर्फ परमेश वैयशा भोसले, वय-२५ वर्ष (रा. भेंडाळा ता.गंगापुर जि.औंरगाबाद), महेश रामकिसन धोत्रे वय- २१ वर्ष (रा. प्रवारासंगम ता. नेवासा जि. अहमदनगर), राजु शिवाजी जाधव वय- २७ वर्ष (रा. भेंडाळा ता.गंगापुर जि.औंरगाबाद), सचिन अशोक जाधव वय- २४ वर्ष (रा. प्रवारासंगम ता. नेवासा जि.अहमदनगर), मंगेश शेषराव गायकवाड (रा.कुंटेफळ ता.जि.औंरगाबाद), संतोष अशोक जाधव (रा. प्रवारासंगम ता. नेवासा), विठ्ठल भाऊसाहेब टरगळे (रा. प्रवारासंगम ता. नेवासा), संभाजी शिवाजी जाधव (रा. भेंडाळा ता.गंगापुर जि.औंरगाबाद) इत्यादी इसमांनी दरोडा टाकण्याच्या तयारीत असतांना, श्रीगोंदा पोलीस स्टेशनला मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने नमुद ठिकाणी हे सर्व आढळून आले. त्यानुसार पोलिसांनी केलेल्या कारवाईत परमेश भोसले, महेश धोत्रे, राजू जाधव व सचिन जाधव या चौघांना ताब्यात घेण्यात यश आले आहे.

शहरातील रस्त्यांचे खड्डे प्रकरण थेट कोर्टात, 7 ऑक्टोबरला सुनावणी

त्यांच्याकडून ५,३०,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल ज्यात एक टाटा कंपनीचा पांढरा रंगाचा छोटा हत्ती, तिन लाकडी ड्रम त्याला हिरवा, काळा, लाल रंगाचे केबल गुंडाळलेली व एक पिवळा रंगाची १२४ मिटर लांबीची सुट्टी केबल, काळया रंगाची ३० मिटर लांबीची जाड केबल, एक कटावणी, लोखंडी मुठीचा धारधार सुरा, २० फुट लांबीची नायलॉन दोरी, अंदाजे २००/- ग्रॅम मिरची पावडरची पुडी असे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजनकर हे या प्रकरणाचा तपास करत असून, पोना. विकास वैराळ यांनी हा गुन्हा दाखल केला आहे.

हे पण पहा  – Ahmednagar | सफर चंद्रा वरची | Ride is on the moon

Related Posts
1 of 1,608
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: