पेट्रोलच्या दरात सलग दहाव्या दिवशी वाढ, जाणून घ्या आजचा आपल्या शहरातील दर

0 190
नवी मुंबई – सामान्य जनतेच्या खिश्याला सतत वाढत असलेल्या पेट्रोल (Petrol) आणि डिझेल (Diesel) च्या  दरामुळे कात्री लागत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मागच्या दहा दिवसांपासून वाढ सुरूच आहे. देशातील अनेक शहरात आता पेट्रोल प्रतिलिटर ११० पेक्षा जास्त दराने मिळत आहे तर डिझेल च्या दर देखील शंभर पेक्षा जास्त आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचा बजेट बिघडला आहे. आज पेट्रोल 34 पैशांनी महाग झाले असून डिझेल 37 पैशांनी महागले आहे. (Petrol prices rise for tenth day in a row, find out today’s rates in your city)
मुंबईमध्ये आज पेट्रोलची किंमत 112.11 पैसे इतकी आहे तर डिझेलचा दर प्रति लिटर 102.89 पैसे आहे.  पावर पेट्रोल 116.02 पैसे आहे. पेट्रोल 130 रुपये प्रती लिटरपर्यंत जाऊ शकते असं बोलले जात आहे.  या महिन्यात केवळ 12 दिवसांत पेट्रोल दर 3.48 पैशांनी महागले आहे, तर डिझेल दरात 4.04 पैशांनी वाढ झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींचा परिणाम आवश्यक गोष्टींवर होतो. त्यामुळे सर्वसामान्यांचे लक्ष दररोज बदलणाऱ्या पेट्रोल डिझेलच्या किंमतीवर असते.
 हे पण पहा  – Eid E Milad un Nabi Ahmednagar 2021
Related Posts
1 of 1,603

 जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल – डिझेलचे दर

तुम्ही SMS’च्या मदतीने रोज पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तपासू शकता.  इंडियन ऑइलच्या संकेतस्थळानुसार RSP सोबत तुमच्या शहराचा CODE नंबर टाइप करून 9224992249 या क्रमांकावर तुम्हाला SMS पाठवावा लागणार आहे.

BPCL ग्राहक RSP लिहून 9223112222 आणि HPCL ग्राहक HPPrice असं टाईप करून 9222201122 या क्रमांकावर SMS पाठवून पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाणून घेऊ शकतात.(Petrol prices rise for tenth day in a row, find out today’s rates in your city)

चक्क.. डेव्हिड वॉर्नरने लावला रोहित शर्मावर चोरीचा आरोप , जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: