Petrol Diesel Prices: पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा होणार वाढ? जाणून घ्या आजचा दर

0 213
Petrol Diesel Prices: Will petrol-diesel prices rise again? Find out today's rate

 

मुंबई – शुक्रवारी सकाळी पेट्रोल-डिझेलचे (Petrol-diesel) नवीन दर सरकारी तेल कंपन्यांनी जाहीर केले असून आज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बद्दल करण्यात आलेला नाही. मात्र क्रूड ऑइलच्या (Crude oil) वाढत्या किमतींच्या कारणामुळे कंपन्यांवर पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये वाढ करण्याचा दवाब वाढत आहे.

ब्रेंट क्रूडचा भाव 110 डॉलरच्या वर गेल्यास पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढण्यास सुरू होऊ शकतात. तेल कंपन्यांनी 6 एप्रिल रोजी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ केली होती. त्यादरम्यान केवळ 15 दिवसांत तब्बल 14 वेळा इंधन दर वाढवण्यात आला होता. या 14 दिवसांत एकूण 10.20 रुपये प्रति लीटरची वाढ झाली होती. त्यानंतर दिल्लीत पेट्रोल 105 तर मुंबईत 120 रुपये प्रति लीटर आहे. क्रूड दर 110 डॉलरच्या खाली असल्याने भारतात इंधन दरात कोणतीही वाढ केली नसल्याचं कंपन्यांचं म्हणणं आहे.

 

चार महानगरात पेट्रोल-डिझेल दर

दिल्लीत पेट्रोल 105.41 रुपये आणि डिझेल 96.67 रुपये प्रति लीटर

मुंबईत पेट्रोल 120.51 रुपये आणि डिझेल 104.77 रुपये प्रति लीटर

Related Posts
1 of 2,222

चेन्नईमध्ये पेट्रोल 110.85 रुपये आणि डिझेल 100.94 रुपये प्रति लीटर

कोलकातामध्ये पेट्रोल 115.12 रुपये आणि डिझेल 99.83 रुपये प्रति लीटर

 

दररोज 6 वाजता बदलतो इंधन दर 

देशातील तीन ऑईल मार्केटिंग कंपन्या HPCL, BPCL आणि IOCL रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करतात. पेट्रोल-डिझेल दरात एक्साइज ड्यूटी, डिलर कमीशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर याचा किंमत दुप्पट होते.

 

 

पेट्रोल-डिझेल दर तुम्ही SMS द्वारेही जाणून घेऊ शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. IOCL च्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: