
Petrol And Diesel Price: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा दर पुन्हा एकदा 85 डॉलर प्रति बॅरलच्या जवळ पोहोचला आहे. अशा परिस्थितीत भारतीय बाजारपेठेत पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवर दिलासा मिळण्याची आशा नाही, अशी अटकळ बांधली जात आहे.
देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर आज 21 जानेवारी रोजी स्थिर आहेत. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर 96.72 रुपये आणि डिझेलचा दर 89.62 रुपये प्रतिलिटर आहे. मुंबईत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 106.31 रुपये तर डिझेलचा दर 94.27 रुपये प्रतिलिटर आहे. याशिवाय चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 102.63 रुपये आणि डिझेलचा दर 94.24 रुपये प्रति लिटर आहे. त्याचवेळी कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. भारतीय तेल कंपन्यांनी अनेक दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल केलेला नाही.
iocl नुसार, देशातील सर्वात स्वस्त पेट्रोल पोर्ट ब्लेअरमध्ये आहे, जिथे किंमत 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती राष्ट्रीय स्तरावर मे 2022 पासून आतापर्यंत अपरिवर्तित आहेत. अशा स्थितीत कच्च्या तेलाचे दर स्वस्त झाल्यानंतरही भारतात पेट्रोल-डिझेलचे दर कमी होत नसताना कच्च्या तेलाच्या दरात वाढ झाल्याने दिलासा मिळणार नाही का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
राज्य स्तरावर लावलेल्या करामुळे वेगवेगळ्या राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती भिन्न असतात. तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर तुम्हाला एसएमएसद्वारे दररोज कळू शकतात. यासाठी इंडियन ऑइलच्या (IOCL) ग्राहकांना RSP कोड 9224992249 या क्रमांकावर पाठवावा लागेल.